शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘डीपीडीसी’ निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:03 IST

९ पैकी ५ जागांवर भाजपा उमेदवार विजयी: ३ जागी राष्टÑवादी तर शिवसेनेच्या वाट्याला केवळ १ जागा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली मतमोजणीशिवसेनेला केवळ ग्रामीणची १ जागातीन तासात आटोपली मतमोजणी
लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव, दि.८- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) ९ जागांसाठी गुरूवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. या ९ पैकी ५ जागा जिंकत भाजपाने वर्चस्व सिद्ध केले. तर ३ जागी राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला केवळ ग्रामीण मतदार संघातील नागरिकांचा मागासप्रवर्ग गटातील एक जागा जिंकता आली.सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. टेबल क्र.१ वर ग्रामीणच्या नामाप्र गटातील २ जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली. तर टेबल क्र.२ वर लहान नागरी गटातील नामाप्र च्या १ जागेसाठीची तर टेबल क्र.३ वर लहान नागरी गटातील नामाप्र महिला १ जागेसाठीची मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीला मतपत्रिकांचे उमेदवाराच्या पसंतीक्रमानुसार विभाजन करून नंतर मतमोजणी करण्यात आली. ग्रामीण मतदार संघासाठी एकूण मतदार ६७ तर लहान नागरी गटासाठी एकूण मतदार ३९१ होते. मात्र त्यापैकी अनुक्रमे ९५.५२ टक्के व ९०.२८ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण मतदार संघग्रामीण मतदार संघात नामाप्र गटात २ जागांसाठी शिवसेनेचे गोपाल घनश्याम चौधरी, पिंप्री ता.धरणगाव, राष्टÑवादीकाँग्रेसचे भूषण काशिनाथ पाटील,सायगाव ता.चाळीसगाव व राष्ट्रवादीचेच हिंमत वामन पाटील हे रिंगणात होते. त्यात गोपाल चौधरी यांना २७, भूषण पाटील यांना २९ तर हिंमत पाटील यांना १३ मते मिळाली. गोपाल चौधरी व भूषण पाटील हे पहिल्याच फेरीत विजयी झाले. एकूण ६४ मतदान झाले होते. त्यापैकी ५ मते बाद ठरली. तर ५९ वैध ठरली.लहान नागरी मतदार संघ नामाप्र गटलहान नागरी मतदार संघातील नामाप्र गटाच्या एकाजागेसाठी प्रविण (वासुदेव) रघुनाथ चौधरी, भाजपाचे राजेंद्र रामदास चौधरी,चाळीसगाव व राष्टÑवादीचे राजेश गजानन वानखेडे, सावदा हे तिघे उमेदवार रिंगणात होते. त्यात राजेश वानखेडे हे १९० मते मिळवून विजयी झाले. राजेंद्र चौधरी यांना ६३ तर प्रवीण चौधरी यांना ३५ मते मिळाली. एकूण ३५२ मतदान झाले होते. त्यापैकी ५८ मते बाद ठरली. तर २९४ मते वैध ठरली.इन्फो-एरंडोलच्या जयश्री पाटील एका मताने विजयीलहान नागरी मतदार संघातील नामाप्र महिला गटाच्या एका जागेसाठी शिवसेनेच्या विजया प्रकाश पवार, चाळीसगाव, भाजपाच्या जयश्री नरेंद्र पाटील, एरंडोल व शिवसेनेच्या कल्पना विलास महाजन,धरणगाव असे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी जयश्री पाटील यांना १३८,विजया पवार यांना १३७ तर कल्पना महाजन यांना २९ मते मिळाली. त्यात जयश्री पाटील या अवघ्या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या. एकूण ३५२ मतदान झाले होते. पैकी ४८ मते बाद ठरली. तर ३०४ मते वैध ठरली.लहान नागरी मतदार संघ सर्वसाधारण गटात झाली चुरशीची लढतलहान नागरी मतदार संघातील सर्वसाधारण गटाच्या २ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यात सुनील रमेश काळे, वरणगाव, राजेंद्र रामदास चौधरी,चाळीसगाव, यशवंत वासुदेव दलाल, भालचंद्र रामभाऊ जाधव,धरणगाव, पुष्पलता साहेबराव पाटील,अमळनेर, मनोज भाऊराव पाटील,अमळनेर, मुकेश नरेंद्र पाटील,भुसावळ, विनय (पप्पू) शशिकांत भावे, धरणगाव, मंगेश सुधाकर तांबे,पारोळा, महेंद्र एकनाथ धनगर,चोपडा, अमोल पंडितराव शिंदे,पाचोरा, मिलिंद शंकर वाघुळदे फैजपूर,ता.यावल यांचा समावेश होता. त्यात भाजपाचे सुनील रमेश काळे पहिल्याच फेरीत व भाजपाचेच राजेंद्र रामदास चौधरी हे दहाव्या फेरीत विजयी झाले. एकूण ३५३ मतदान झाले होते. त्यापैकी ७३ मते बाद ठरली. तर २८० मते वैध ठरली.लहान नागरी मतदार संघ सर्वसाधारण महिलालहान नागरी मतदार संघातील सर्वसाधारण महिला गटाच्या ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. त्यात विजया कुशल जावळे, सावदा ता.रावेर, पुष्पलता साहेबराव पाटील,अमळनेर, कल्पना दशरथ महाजन,एरंडोल, सोनल रमाकांत महाजन,भुसावळ, वर्षा राजेंद्र शिंदे एरंडोल यांचा समावेश होता. सोनल महाजन या पहिल्या फेरीत पहिल्या क्रमांकाने तर वर्षा शिंदे पहिल्याच फेरीत दुसºया क्रमांकाने विजयी झाल्या. तर पुष्पलता पाटील चौथ्या फेरीत विजयी झाल्या. एकूण ३५३ मतदान झाले होते. त्यापैकी ५७ अवैध ठरले तर २९६ मते वैध ठरली. -----इन्फो-विजयी उमेदवारग्रामीण मतदार संघगोपाल घनश्याम चौधरी (नामाप्र) (शिवसेना)भूषण काशिनाथ पाटील (नामाप्र) (राष्टÑवादी)लहान नागरी मतदार संघ सुनील रमेश काळे (सर्वसाधारण) (भाजपा)राजेंद्र रामदास चौधरी (सर्वसाधारण) (भाजपा)सोनल रमाकांत महाजन (सर्वसाधारण महिला)(भाजपा) वर्षा राजेंद्र शिंदे (सर्वसाधारण महिला)(राष्टÑवादी)पुष्पलता साहेबराव पाटील (सर्वसाधारण महिला) (भाजपा)राजेश गजानन वानखेडे (नामाप्र) (राष्टÑवादी)जयश्री नरेंद्र पाटील(नामाप्र महिला) (भाजपा)