शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:00 IST

सभापतीपदी प्रफुल्ल पाटील, आमदार गटाचा पराभव

अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदावर भाजपचे प्रफुल्ल पाटील यांची १२ विरुद्ध ४ मतांनी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक जी.एच.पाटील होते.उदय वाघ यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. ११ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. एकूण १८ संचालकांपैकी उदय नंदकिशोर पाटील यांना नुकतेच अपात्र ठरविण्यात आले होते.दुपारी १२ वाजता उमेदवारी भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. वाघ गटातर्फे प्रफुल्ल पाटील, तर आ.चौधरी गटातर्फे पद्माकर गोसावी यांनी अर्ज भरला होता. १२ संचालकांनी आपले मत उदय वाघ गटाचे प्रफुल्ल पाटील यांना दिले. ४ संचालकांनी चौधरी गटाचे पदमाकर गोसावी यांच्या बाजूने मतदान केले. उपसभापती अ‍ॅड. श्रावण सदा बह्मे, पराग पाटील, विजय प्रभाकर पाटील, पावबा पाटील, विश्वास पाटील, मंगला पाटील, उज्ज्वला पाटील, हरी वाणी, शंकरलाल बीतराई, भगवान कोळी, सुरेश पाटील, महेश देशमुख उपस्थित होते.यावेळी भाजपच्या आ.स्मिता वाघ, मा.आ.साहेबराव पाटील, पं.स. सभापती वजाबाई भिल्ल, माजी उपसभापती श्याम अहिरे, माजी नगरध्यक्ष विनोद पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, अर्बन बँक चेअरमन पंकज मुंदडे, व्हा.चेअरमन प्रवीण जैन, उपनगराध्यक्ष विनोद लाबोळे, जि.प.सदस्य मीना पाटील, संगीता भिल्ल, सोनू पवार, पं.स.सदस्य रेखा पाटील, विनोद जाधव, बाधकाम सभापती मनोज पाटील, महेश पाटील, राजेंद्र यादव, सुरेश पाटील, अयाज पठाण, शीतल देशमुख आदी उपस्थित होते.आमदार चौधरींच्या गटाचा पराभवबाजार समितीत अमळनेर पॅनेल, जिल्हा मध्यवर्ती बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नंदुरबार महापालिका व आता बाजार समिती सभापती निवडीतही विद्यमान आमदारांच्या गटाचा पराभव झाल्याची टीका भाजप कार्यकर्त्यांनी केली.चौकटी--गोसावींची हरकत फेटाळलीपद्माकर गोसावी यांनी सभापती निवडीबाबत तांत्रिक दोष दाखवला. यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने निवड प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी करणारा अर्ज दिला. मात्र निवडणूक अधिकारी जी.एच.पाटील यांनी हरकत फेटाळली.चौथे मत कुणाचे?आमदार चौधरी गटाचे स्वत: पद्माकर गोसावी, सुरेश पाटील, महेश देशमुख यांच्याव्यतिरिक्त चौथे मत कुणाचे मिळाले याबाबद्दल चर्चा सुरू होती. संचालक सचिन पाटील हे निवड सभेला गैरहजर होते.फोटो ओळ :नूतन सभापती प्रफुल्ल पाटील यांचा सत्कार करताना आमदार स्मिता वाघ, माजी आ. साहेबराव पाटील, माजी सभापती उदय वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम आहिरे, उपसभापती अ‍ॅड.एस.एस बह्मे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, महेंद्र बोरसे आदी.