शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक पुत्राने शिवसेनेच्या माजी नगरसेवक पुत्राची दुचाकी जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:23 IST

दोन गटातील वाद पुन्हा उफाळला

ठळक मुद्दे तीन जणाविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव : पिंप्राळा हुडकोमध्ये आजी-माजी नगरसेवकातील जुना वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळून आला. त्यात माजी नगरसेवक पूत्र जाकीर खान रसूल खान यांची बुलेट पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना घडली. याप्रकरणी भाजपा नगरसेवक पूत्र शेख शफी शेख शरीफ (रा.हुडको),मोसीन उर्फ विंचू अय्युब खान व अफसर शेख अनवर भिस्ती (दोघे रा.शाहूनगर) या तिघांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागात भाजपा व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये जुना वाद आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक पूत्र जाकीर खान रसूल खान यांनी शनिवारी रात्री साडे नऊ वाजता त्यांनी बुलेट (क्र.एम.एच १९ सी.क्यू ००२४) ही घराजवळ लावलेली होती. सैय्यद शोहेब सैय्यद अमिन व सैय्यद ईस्माईल लियाकत अली यांच्या लक्षात ही घटना आली.शस्त्र, पेट्रोलची बाटली होती सोबतफिर्यादीनुसार, मोसीन उर्फ विंचू व त्याच्यासोबत दोन जणांनी जाकीर खान रसृूल खान यांच्या दरवाजाला लाथा मारल्या. कंपाऊडमधील माठ फोडून, सामानाची फेकाफेक केली व यानंतर बुलेटवर पेट्रोल टाकून पेटूवन दिले, असे शेजारी रहिवासी सैय्यद शाहेब सैय्यद अमिन व सैय्यद ईस्माईल लियाकत अली यांनी जाकीर खान यांनी सांगितले. दुचाकी जाळल्यावर तिघं जण दुचाकीवरुन पळून गेले. यावेळी संशयितांच्या हातात धारदार शस्त्र व पेट्रोलची बाटली होती असेही फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी जावेद रसूल खान यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ विंचू अय्युब खान, अफसर शेख अनवर भिस्ती व शेख शफी शेख शरीफ रा.पिंप्राळा हुडको या तिघांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ७० ते ८० हजाराच्या दुचाकीचे नुकसान झाल्याचे त्यात नमूद आहे.शफीचा भाऊ तडीपारनगरसेवक पूत्र शफीचा भाऊ आसिफ याला पोलिसांनी यापूर्वीच तडीपार केले आहे. या दोन्ही गटात यापूर्वी देखील मोठा वाद झाला होता. आता पुन्हा हा वाद उफाळून आला. दरम्यान, पोलिसांनी बुलेट जाळणाऱ्यांना आणले होते, मात्र राजकीय दबावामुळे त्यांना सोडून दिल्याचा आरोप झाला. सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.