याप्रसंगी आगामी कार्यक्रम पूर्ण ताकदीनिशी संपन्न करावे, असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे यांनी केले.
जागतिक योग दिवस, स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन, जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आणीबाणीविरोधी काळा दिवस, मन की बात कार्यक्रम तसेच बुथ समित्या पूर्ण करणे, आघाड्यांची घोषणा करणे आदी कार्यक्रमांचे नियोजन याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, तालुकाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे यांचा सत्कार भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी केला, तर नवनिर्वाचित जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील यांचा सत्कार तालुका बुथ समिती संयोजक वसंत पाटील यांनी केला. समारोप मधुकर काटे तर प्रास्ताविक अमोल पाटील, सूत्रसंचालन अनिल पाटील, आभार तालुका बुथ समिती संयोजक वसंत पाटील यांनी मानले.