शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा व वंचित आघाडीतच खरी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:12 IST

अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर : सामाजिकरण होण्यासाठी वंचितांना उमेदवारी

जळगाव : लोकसभा निवडणुकीत खरी लढत भाजपा व वंचित बहुजन आघाडीतच होईल, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने माढामधून माघर घेणे हे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.जळगावात आयोजित सभेसाठी ते शुक्रवार, २२ मार्च रोजी सकाळी पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुकीचे सामाजिकरण व्हावे. आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे नात्या- गोत्यातील लोकांना उमेदवारी देऊन लढविल्या जातात. बहुजनांना संधी देणार कोण? म्हणून आम्ही सर्व समाजांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोेत. या ही पुढे जाऊन ज्या जातीच्या उमेदवाराला संधी दिली. त्याची जातही देत आहोत.चार जागांचा निर्णय बाकीएमआयएमचा औरंगाबाद व उत्तरमध्य मुंबईतून उमेदवार असेल. याशिवाय सोलापूर, नागपूर, अकोला व उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवार जाहीर करणे बाकी असल्याचे ते म्हणाले.सर्वांना शिक्षणअजेंड्यामध्ये सर्वांना शासनामार्फत शिक्षण मिळावे, केजी टू पीजी सर्व शिक्षण स्पर्धामुक्त व्हावे अशी जबाबदारी सरकारची असावी, यामुळे संस्थांकडून होणारे बाजारीकरण थांबेल. तसेच बॅँकींग पद्धतीत तारणाशिवाय कर्जच मिळत नाही, यासाठी समांतर बॅकिंग व्यवस्था निर्माण करून वंचितांना विनातारण कर्ज कसे मिळू शकेल, असे आपले प्रयत्न असतील. यासाठी रोजगार निर्मितीवरही आपला भर असेल, असे सांगितले.यावेळी माजी मंत्री दशरथ भांडे, उमेदवार अंजली बाविस्कर, मुकुंद सपकाळे यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुबार जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.कुणाचीही लाट नाहीशरद पवार यांनी माढामधून उमेदवारी मागे घेणे हे धक्कादायक होते, असे सांगत यावेळी लाट हा प्रकार नसेल असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, व्यापारी वर्गात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे. त्यामुळे लाट ही कुणाचीही दिसत नाही. मात्र लढतच विचारात घेतली तर ती कॉँग्रेस विरूद्ध भाजपा अशी नाहीच. भाजपा विरूद्ध वंचित बहुजन आघाडीतच असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण