शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

भुसावळ : महाविकास आघाडी सर्व बाबतीत अपयशी ठरत असून काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी ...

भुसावळ : महाविकास आघाडी सर्व बाबतीत अपयशी ठरत असून काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण फेटाळले. ठाकरे सरकारच्या नाकर्तेणामुळे आरक्षणाचा हक्क गमवावा लागला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी भाजपतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात भाजपतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद करण्यात आले की, न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही राज्यातील ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती.

जिल्हानिहाय सर्वेक्षण करून आरक्षण वाचवा

राज्य सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप भाजपने केला असून, ते पुन्हा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. आता तरी राज्य सरकारने तातडीने मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी. आणि ओबीसी समाजाच्या लोकसंख्येविषयी जिल्हानिहाय सर्वेक्षण करून अहवालाच्या आधारावर आरक्षण वाचविण्यासाठी तातडीने हालचाल करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, नगरसेवक युवराज लोणारी, अजय भोळे, रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, भालचंद्र पाटील, संजय बोचरे, नंदकिशोर बडगुजर, दिलीप कोळी, गोपी राजपूत, प्रशांत भट, राजेंद्र नाटकर, अ‍ॅड.प्रकाश पाटील, निखिल वायकोळे, राहुल तायडे, बिसन गोहर, अजय नागराणी, संजय दांडगे, बिकेश जोशी, अक्षय जाधव आदी सहभागी झाले.