शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रावेर-जळगावातून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:19 IST

गिरीश महाजन : रक्षा खडसेंना उमेदवारी मिळावी; माझ्या कुटुंबातील कोणीही रिंगणात नसेल

जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी आमच्याकडे मोठी स्पर्धा असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात वेळ होत आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आपलीही इच्छा आहे. मात्र माझ्या कुटुंबातील कोणीही उमेदवार नसेल. लोकसभाच काय विधानसभेलाही घरातील कोणी उमेदवार नसेल असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले, पत्नी साधना महाजन या निवडणूक लढविणार अशी चर्चा पसरविली जात आहे. नगराध्यक्षपदापर्यंत ठिक आहे. विधान परिषदेच्या वेळीही आम्हाला आग्रह झाला होता, पक्षानेही तयारी दाखविली होती मात्र लोकसभा, विधानसभा अशा कोणत्याही निवडणुकांमध्ये माझी पत्नी वा कुटुंबातील कोणीही आता तसेच भविष्यातही उमेदवार नसेल.रक्षा खडसेंना उमेदवारी मिळावीजळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात पक्षाकडून मोठी स्पर्धा आहे. रावेरमधून रक्षा खडसे, हरिभाऊ जावळे, अजय भोळे व अन्य काही जण इच्छूक आहे. मात्र रक्षा खडसे यांनाच उमेदवारी मिळावी अशी आपलीही इच्छा आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून जास्त स्पर्धा आहे.पोलीस अधिकारी साहेबराव पाटील, प्रकाश पाटील, उद्धवराव माळी, डॉ. संजय पाटील, करण पवार, एम.के. पाटील, विद्यमान खासदार ए.टी. पाटील, डी.एम. पाटील, आमदार स्मिता वाघ यांच्यासह अन्य काही जण इच्छूक आहेत. स्पर्धेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राष्टÑवादी, कॉँग्रेसचा सुपडासाफजळगाव, जिल्ह्यात कॉँग्रेस, राष्टÑवादीचे अस्तित्व काय आहे? असा सवाल करून गिरीश महाजन म्हणाले. साधा एक नगरसेवक या पक्षांचा नाही. राष्टÑवादीचा एक आमदार आहे. आगामी निवडणुकांमध्ये सुपडासाफ होईल.त्यामुळे या कुणाचे यश, कुणाचे अपयश अशा काही गप्पा मारू नये अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली.भाजपात गुप्त बैठकांना वेगजळगावलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांची मंगळवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. बैठकीचा तपशिल मात्र बाहेर पडू देण्यात आला नाही. आमदार स्मिता वाघ या सर्व बैठकांना उपस्थित होत्या. महाजन यांनी दुपारी ५ वाजता कोर्ट चौकातील व शिवतीर्थ मैदानासमोरील आपल्या जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयात या बैठका घेतल्या. बैठकांना शहरातील नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. आमदार तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी उपस्थित होते. काही वेळाने दुसरे इच्छूक उमेदवार प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ हेदेखील या ठिकाणी आले. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होती. बैठकांबाबत काही नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘बैठक सहज होती’ अशीच उत्तरे दिली.सुरेशदादा आमचेच... युती झाली महापालिकेत भविष्यात काय स्थिती असेल, याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मनपात युतीचीच सत्ता आहे. शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उमेदवारी असेल काय? असे विचारले असता सुरेशदादा जैन हे आमचेच असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभेसाठीही युती असेल असे स्पष्ट करून जळगाव विधानसभेच्या जागेवर भाजपाने यश मिळविले आहे. त्यामुळे या जागेसाठी आम्ही आग्रही राहूू असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Politicsराजकारण