शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बोदवडची ब्रिटिशकालीन ओळख असलेले बायबल कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 19:07 IST

बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देख्रिसमसनिमित्त कार्यक्रमांची तयारी१० एकर जागेवर ब्रिटिशकालीन इमारत व मराठी अलायन्स चर्चविदेशातील ख्रिस्त बांधव मार्गदर्शन करण्यासाठी येतात

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे.या कॉलेजची स्थापना सन १९०७ मध्ये सुमारे १० एकर जागेवर अमेरिकेचे रेव्ह. ख्रिश्चन आयकर यांनी केली व पहिले प्राचार्य म्हणून कार्यही बजावले. बायबलचे शिक्षण देणारे महाराष्ट्रातील पहिले कॉलेज ठरले असून, आज १११ वर्षे पूर्ण झाले आहे.या कॉलेजमधून ख्रिस्त धर्माची शिकवण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कॉलेजचे नावलौकिक करीत आहेत. काही मिशनरी पालक, शिक्षक, पादरी म्हणून कार्य करीत आहेत, तर दरवर्षी या कॉलेजला विदेशातील ख्रिस्तधर्मीय बांधव मार्गदर्शन, समुपदेशन करण्यासाठी येत असतात. यात आॅस्ट्रेलियातील रेव्ह.जॉन असेंन केस हे संस्थेला भेट देतात व मार्गदर्शन करीत असतात.ब्रिटिशांनी सत्ता काळात बायबल कॉलेज हे ख्रिस्त बांधवांना नागपूर-मुंबई लोहमार्गावर बोदवड या रेल्वेस्थानकावर थांबण्यासाठी व प्रार्थनेसाठी ही जागा निवडली. १० एकर जागेवर ब्रिटिशकालीन इमारत तसेच मराठी अलायन्स चर्चची निर्मिती केली. नंतर येथे धर्माची शिकवण देण्यासाठी कॉलेज स्थापन करण्यात आले असून, आजपावेतो ते कार्य मिशनरीद्वारा सुरू आहे.प्रभू येशूच्या जन्मानिमित्ताने बायबल कॉलेज व चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यात नित्य प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे तालुक्यात कोठेही ख्रिस्त बांधव संख्येने नसतानाही चर्चद्वारे प्रभू येशूचा शांती-प्रेमाचा संदेश देण्यात येतो.या संस्थेला १५ वर्षे प्रशासक म्हणून प्रभूदास पांडे यांनीही सेवा दिली आहे. संस्थेची अविरत प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आजही संस्थेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून, यात तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBodwadबोदवड