शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 15:02 IST

व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील गत ४० वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, भारोत्तोलन स्पर्धा तथा संगीत, कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वा राजकीय क्षेत्रात महाविद्यालयाचा नावलौकिक प्राप्त करता यावा तथा त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचा सूर माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आळवण्यात आला.

रावेर, जि.जळगाव : येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील गत ४० वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, भारोत्तोलन स्पर्धा तथा संगीत, कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वा राजकीय क्षेत्रात महाविद्यालयाचा नावलौकिक प्राप्त करता यावा तथा त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचा सूर माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आळवण्यात आला.प्रारंभी, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे स्वागत समारंभ पार पडला. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल होते. त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कोणते उपक्रम राबवावे याविषयी सूचित केले.यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे टी .बी. महाजन, राजू खिरवडकर, अ‍ॅड.रमाकांत महाजन, राजकिरण शिवदे, प्रणित महाजन, लखन महाजन, स्मिता वाणी, सुनील वाघ, आरती पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपापल्या महाविद्यालयातील आठवणींना उजळा दिला .दरम्यान, या कार्यक्रमात माजी विद्यार्थी तथा पोलीस नाईक योगेश टी. महाजन यांचा सत्कार करण्यात आला. गत दहा वर्षांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगचे खेळात पारंगत करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी असल्याने त्यांचा सहृद्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी राजकिरण शिवदे व कुंदन मानकर हे सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या माजी विद्यार्थी मेळाव्यात राज्य शिखर बँकेचे वरिष्ठ अधिकारी डी.एन.पाटील, नगरसेवक यशवंत दलाल, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डी.सी.पाटील, प्रा.सी.एस.पाटील, रंगपंचमी व्याख्यानमालेचे अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ.एस.जी.चिंचोरे यांनी केले. रावेर परिसरातून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एस.जी. चिंचोरे, प्रा.डॉ.जे.एम.पाटील, प्रा.सी.पी.गाडे, प्रा.एस.डी.धापसे, प्रा.डॉ.बी.जी. मुख्यदल, प्रा.एम.एम.पाटील, प्रा.एस.यु.पाटील, प्रा.पी.व्ही.पाटील, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटना यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयRaverरावेर