भुसावळ : शहर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या व न्यायालयाच्या समोरील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाबाहेरच चावरीया परिवारातील दोघा सदस्यांवर दुचाकींवर आलेल्या आरोपींनी गावठी कट्टय़ाने बेछूट गोळीबार केल्याची गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली़ या थरारक घटनेने भुसावळ शहर हादरले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे दुस:या जखमीवर जळगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ खुनाच्या अवघ्या तासाभरात बाजारपेठ पोलिसांनी दीपनगरजवळून दोघा मुख्य आरोपींना गावठी कट्टय़ांसह अटक केली आहे. गोळीबाराने भुसावळ हादरले शहर व तालुक्यात वर्षभरात तब्बल नऊ जणांचे खून झाले आहेत़ त्यात मोहन बारसे यांच्या 3 जुलै रोजी झालेल्या निघरूण खुनानंतर चावरीया व व बारसे परिवारात वैमनस्य निर्माण झाले आह़े त्याचीच परिणीती गुरुवारच्या गोळीबारात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली़ न्यायालयासमोरील घटना मोहन पहेलवान यांच्या खून प्रकरणातील संशयीत व न्यायालयीन कोठडीत असलेल्या नट्ट चावरीया यांच्या जामिनासाठी त्यांचे बंधू नंदू चावरीया (32) व विनोद चावरीया (35) हे गुरुवारी न्यायालयात आले होत़े श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागूनच असलेल्या रामावतार चहा टी स्टॉलवर दोघे बसलेले असताना विना क्रमांकाच्या दुचाकीवर मिथून मोहन बारसे (30, वाल्मीक नगर, भुसावळ) व जयेश ठाकूर (22, भुसावळ) येताच त्यांनी उभयंतांशी शाब्दीक वाद करत सोबत आणलेल्या गावठी कट्टय़ातून गोळीबार सुरू केला़ काही कळायच्या आत एक गोळी नंदू यांच्या डोक्यातून आरपार गेली तर दुसरी गोळी विनोद यांच्या डाव्या कानाला छेदून गेली़ काही कळायच्या आत आरोपींनी आरपीडी रस्त्याने पळ काढला़ गोळीबारानंतर शहर पोलीस ठाण्यातील हवालदार रिहान खान यांनी आरोपींचा डी़एस़ग्राऊंडर्पयत पाठलाग सुरू केला मात्र आरोपींनी त्यांच्या दिशेनेदेखील एक गोळी झाडली़ जखमींना तातडीने स्थानिक कोनार्क व नंतर जळगावच्या इंडो अमेरिकन रुग्णालयात हलविण्यात आल़े पोलिसांची धावपळ न्यायालयासमोरच झालेल्या गोळीबारानंतर पोलीस वतरुळात मोठी खळबळ उडाली़ पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे, बाजारपेठचे निरीक्षक नजन-पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत आरोपी व घटनेबाबत माहिती जाणून घेतली़ अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही भेट दिली़ तासाभरात आरोपी गजाआड गोळीबारानंतर आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीने आरपीडी रस्त्याने दीपनगरकडे पलायन करीत असल्याची माहिती मिळाल्याबरोबर नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल इरफान काझी, माणिक सपकाळे, संजय भदाणे, तुषार जावरे, प्रशांत चव्हाण, बंटी कापडणे यांनी आरोपींना दीपनगर गेटजवळ अटक केली़ गावठी कट्टा व काडतुस जप्त अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे व सात काडतूस (गोळ्या) जप्त केल्या आहेत घटनास्थळावरून पोलिसांनी दोन रिकाम्या पुंगळ्या तसेच दोन गोळ्या (काडतूस) जप्त केल्या आहेत़ रात्री उशिरार्पयत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिसात सुरू होती़ पूर्ववैमनस्यातून झाला गोळीबार 43 जुलै 2015 रोजी मोहन बारसे यांचा जामनेर रस्त्यावर खून झाला होता़ या प्रकरणातील चाजर्शीट दाखल झाल्यानंतर यातील काही आरोपींना जामीन झाला आहे तर नट्ट चावरीया यांचा जामीन करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेसाठी नंदू चावरीया व विनोद चावरीया आले होत़े न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीशी असलेले पूर्व वैमनस्य शिवाय त्याच्या जामिनासाठी जखमी नंदू व विनोद मदत करीत असल्याचे वाईट वाटून कट रचून आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.