शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात भुसावळला ` रेल नीर` प्रकल्प सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत `रेल्वे नीर ` प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. येत्या सहा ...

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत `रेल्वे नीर ` प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून, या प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती आयआरटीसीचे उप महाव्यवस्थापक आनंद झा यांनी `लोकमत` शी बोलतांना दिली.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. भुसा‌वळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात आहे. हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटर मध्ये हा प्रकल्प उभारला जात असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किंमतीला विक्री करण्यात येणार आहे. इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.

इन्फो :

महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प

भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात येणारा ` रेल नीर ` चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे प्रकल्प सुरू असून, लवकरच भुसावळ येथेही सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पात मनुष्यबळाच्या भरतीसाठी आयआरसीटीसीतर्फे लवकरच नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून, स्थानिक योग्य अहर्ता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत : १०० ते १२५ जागांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आयआरसीटीसीतर्फे भुसावळला ` रेल नीर` प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. २४ तासात ७२ हजार पाण्याच्या बॉटल तयार होणार आहे. या प्रकल्पात स्थानिक तरुणानांच नोकरीची संधी देणार आहोत.

आनंद झा, उप महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी, दिल्ली.