भुसावळ : जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानुसार येथील क्वारंटाईन सेंटर बंदचा निर्णय आता बदलला असून ग्रामीण रुग्णालयातील हे सेंटर नव्या आदेशानुसार सुरु राहणार आहे. यामुळे शहर व तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी कोवीड-१९ अंतर्गत कार्यरत भुसावळ ग्रामीण रुग्णालयाची कोविड सेवा ३०नोव्हेंबरला संपुष्टात येत असून फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चोपडा, जामनेर तसेच मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वाँर रूम जळगाव येथेच फक्त कॉविड सेवा सुरू राहणार असल्यानचे नमूद केले होते. यानुसार यावल, रावेरसह भुसावळ तालुक्यासाठी जळगाव हेच सेंटर राहले. यामुळ्य कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही. ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी तरी ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन सेन्टर भुसावळ येथे सुरू ठेवावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नि. तु. पाटील यांनी केली होती. याअनुषंगाने बुधवारी जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी तसे आदेश काढत भुसावल ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी आणि कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही अशा रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन सेन्टर सुरू ठेवण्याचे कळविले आहे.
भुसावळला क्वारंटाईन सेंटर पुन्हा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:03 IST