शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

भुसावळ येथे पालिकेतर्फे खडका रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ढापा टाकून उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:52 IST

५० हजार लोकवस्तीच्या मोहम्मदअली रोड (खडका रोड) परिसराला जोडणाºया डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पुढील रस्त्यावरील कामाला अखेर प्रारंभ झाला आहे,

ठळक मुद्दे‘लोकमत’ वृत्ताचा प्रभावजमजम चौक व अमरदीप चौकातील वाहतूक नसरवानजी फाईल मार्गाने वळवावीदोन्ही बाजूला पक्का रस्ता हवा

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : सुमारे ५० हजार लोकवस्तीच्या मोहम्मदअली रोड (खडका रोड) परिसराला जोडणाºया डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पुढील रस्त्यावरील कामाला अखेर प्रारंभ झाला आहे, दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने गेल्या २४ डिसेंबर रोजी ‘खडका रोडची अवस्था खड्ड्यांमुळे झाली बिकट’ अशा आशयाचे ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनाने ढापा टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे.अमरदीप चौकाकडे जाणाºया मार्गावरील मध्यभागी असलेल्या गटारीची अत्यंत बिकट अवस्था झाली होती व संपूर्ण सांडपाणी हे रस्त्यावर साचले होते व त्या ठिकाणी मोठा खड्डादेखील पडलेला होता. या ठिकाणी रोज असंख्य वाहनचालकांना अपघातदेखील झाल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र पालिका वृत्ताची दखल घेऊन कामाला गटारी व धापा टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे संपूर्ण मोहम्मद अली रोड परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.मोहम्मदअली रोडवरील (खडका रोड) रजा टॉवर व पुढे महामार्गाकडे जाणारा हा प्रमुख व एकमेव मार्ग आहे आणि तो अत्यंत अरुंद आह.े या ठिकाणाहून चार चाकी वाहन सहजगत्या जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी लहान दुकाने व आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर लहान व्यावसायिक आपली रोजीरोटी कमवित असल्याने हा रस्ता आणखीनच रहदारीसाठी अडचणीचा ठरला आहे.ठोस उपाययोजना हवीदरम्यान, अमरदीप टॉकीज नामशेष झालेली आहे. एकेकाळच्या भुसावळचे वैभव असलेले अमरदीप थिएटर हे आता नामशेष झालेले आहे. तरी देखील त्याच नावाने हा परिसर आजही ओळखला जातो. याच रोडवर जमजम व पुढे अमरदीप चौक आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी काही वेगळी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीनेही प्रयत्न करण्याची गरज आहे.दोन्ही बाजूला पक्का रस्ता हवाभुसावळ रेल्वेस्थानक आणि शहराच्या अन्य भागातून येणाºया आणि खडका रोडवर जाणाºया लोकांसाठी केवळ ढापा न टाकता मजबूत व टिकाऊ दर्जेदार रस्ता करण्यात यावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. या कामावर पालिका प्रशासनाने त्यांचे नगर अभियंता यांना जातीने लक्ष केंद्रित करण्यासाठी सूचित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.वाहतूक वळवावीजमजम चौक व अमरदीप टॉकीज चौक या दोन्ही चौकातील गर्दी कमी करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनातर्फे या ठिकाणची वाहतूक नसरवानजी फाईल भागातून वरणगाव मार्गावर वळवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारBhusawalभुसावळ