शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:01 IST

पालिकेला मिळालेला पुरस्कार ‘मॅनेज’ करून मिळाल्याचा ‘जनाधार’चा आरोप

ठळक मुद्देशासनाच्या समितीवरच घेतला विरोधी गटातील सदस्यांनी संशयहतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने तूर्त पाणी गढूळ येत असल्याचे नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिकेला स्वच्छता अभियानाचा मिळालेला पुरस्कार हा मॅनेज करून मिळवला असल्याचा आरोप जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी केल्यामुळे पालिकेच्या सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे अवघ्या सात मिनिटात २१ विषयांना सत्ताधारी गटाने आवाजी मताने मंजुरी देऊन सभा संपल्याचे जाहीर केले.दरम्यान, विरोधकांना सध्या शहरात सुरू असलेली विकास कामे पाहवली जात नाही. यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठले असल्याची टीका नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केली आहे.पालिकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सभेस प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, उपमुख्याधिकारी एस. जे. देशपांडे, गटनेते मुन्ना तेली उपस्थित होते.एक ते चार विषयांना सभागृहाने सर्वानुुमते मंजुरी दिल्यानंतर स्वच्छता महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला मिळालेला पुरस्कार मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्याबाबत विचारविनिमय करणे या पाचव्या विषयाचे वाचन सुरू असताना जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी हा पुरस्कार मॅनेज करून मिळवला असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी गटाचे नगरसेवक व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच हमरी- तुमरी झाली. सत्ताधारी गटाचे नगरसेवक विरोधकांवर चांगलेच तोडून पडले. प्रसंगी सभागृहातील वातावरण पाहून नगराध्यक्ष भोळे यांनी १ ते २१ विषयांना आवाजी मताने मंजुरी देऊन सभा संपल्याचे जाहीर केले .दरम्यान, जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी गढूळ पाण्याची एक बाटली भरून आणली होती. यावेळी नगराध्यक्ष भोळे यांनी हे पाणी गढूळ असले तरीसुद्धा शुद्ध असल्याचे सांगितले. हतनूर धरणाचे नुकतेच ३६ दरवाजे उघडण्यात आले होते. यावेळी तापी नदीला गढूळ पाणी आले होते. आपल्या पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र हे अतिशय जुने आहे. यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करण्यात येते. मात्र पाण्याचा रंग बदलविण्यात येत नसल्याची माहिती नगराध्यक्ष भोळे यांनी दिली. त्यामुळे पाणी गढूळ असले तरी शुद्ध असते, असा दावा त्यांनी केला, तर अमृत योजनेमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्यात येणार असल्याची सुविधा असल्याचे भोळे यांनी सांगितले.दरम्यान, राज्य शासनाने दिलेला पुरस्कार हा एक समिती नेमून दिलेला असतो. त्यामुळे या पुरस्कारांसाठी निवड ही काटेकोरपणे केली जाते. मात्र पुरस्कारच मॅनेज करून मिळाला असल्याचा आरोप म्हणजे राज्य शासनाच्या त्या समितीवर संशय घेण्यासारखे असल्याची टीका नगराध्यक्ष भोळे यांनी केली.तसेच शहरात अमृत योजना, एल.ई.डी. लाईट, नपा दवाखान्यातील सुविधा यासह अनेक कामे सुरू आहे. ही कामे विरोधकांना सहन होत नाही. यामुळे त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन सर्वसाधारण सभेत गदारोळ केला असल्याचा आरोपही केला आहे.सभेस नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, मेघा वाणी, रमेश नागराणी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, प्रा.दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, जनाधार पार्टीच्या नगरसेविका पुष्पा सोनवणे, कविता चौधरी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ