शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ पालिकेच्या पथकाची १२ ठिकाणी धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:46 IST

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरात १२ ठिकाणी कारवाई केली.

ठळक मुद्देरस्त्यावर थुंकणे पडले महागातकारवाई सुरूच राहणार

वासेफ पटेलभुसावळ : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरात १२ ठिकाणी कारवाई केली.अमळनेरच्या एका व्यक्तीला रस्त्यावर थुंकणे चांगलेच महागात पडले. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ येथे ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. या काळात जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. असे असतानाही काही व्यवहार सुरू दिसले म्हणून उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने धडक कारवाई केली.चाहेल ढाबासमोरील दिलीप पटवारी यांचा वेफर्स कारखाना, खडका चौफुल्ली भागातील शेख रिजवान टायरवाले व खान्देश फेब्रिकेशन, वरणगाव रस्त्यावरील मनिरूल इस्लाम लष्कर गॅरेजवाले, म्युनिसिपल पार्कमधील भाजी विक्रेता अविनाश महेंद्र गोठले, सागर ठाकरे व प्रफुल घाडगे, गवळी वाड्यातील बब्बू किराणा दुकान, जळगाव रस्त्यावरील भारत रेडीएटर, जुना सातारा भागातील विश्वकर्मा फेब्रिकेशन या १० दुकानदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. पूजा कॉम्प्लेक्सजवळील भारत ट्रेडर्स सील करण्यात आले. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या अमळनेर येथील प्रशांत अशोक साळी यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.या पथकात संजय बनाईते, पंकज पन्हाळे, सूरज नारखेडे, रामदास म्हस्के, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, स्वप्नील भोळे, गोपाल पाली, विजय राजपूत, योगेश वाणी, धनराज बाविस्कर, मयूर भोळे, मयूर भोई, दीपक शिंदे, पोलीस कर्मचारी पोकॉ.चारूदत्त पाटील, पो.कॉ. किशोर पाटील यांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ