शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ : भाजपची तयारी, अन्य पक्षांकडून उमेदवाराचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:23 IST

इच्छुक उमेदवार विविध प्रकारे वेधत आहेत जनतेचे लक्ष

उत्तम काळे।भुसावळ : सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात भाजपने तयारी सुरू केली असली तरी अन्य पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित न झाल्याने शोध सुरू आहे. विकास कामांचे उद्घाटन, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत इच्छुकांकडून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.भुसावळ विधानसभा मतदारसंघ २००९ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळेपासून मतदारसंघात प्रत्येक वेळेस इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आमदार संजय सावकारे यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा सपाटा सुरू केला आहे. तर इतर राजकीय पक्षांकडून निवेदने देणे व आंदोलन करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.२००९ साली विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातून शिवसेनेकडे त्यावेळी तब्बल ३० ते ३५ इच्छुक उमेदवारांची यादी होती. मात्र त्यावेळी शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात अ‍ॅड. राजेश झाल्टे यशस्वी झाले होते. राष्ट्रवादीची उमेदवारी तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांनी त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय सावकारे यांना मिळवून दिली होती. व विजय मिळवण्यात यशस्वी झाले होते . २०१४ साली मात्र परिस्थिती अगदी वेगळी झाली होती. शिवसेनेचे पराभूत उमेदवार अ‍ॅड. झाल्टे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. आमदार सावकारे हे भाजपची उमेदवार घेऊन रिंगणात उतरले होते. या निवडणुकीतही त्यांनी यश मिळवले होते.आघाडी व युतीवरही चित्र अवलंबून असून यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण? याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. शिवसेनेतर्फे अद्याप उमेदवार पुढे आलेले नाहीत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (पीआरपी)चे नेते जगन सोनवणे हे विविध प्रश्न हाती घेऊन आंदोलन करीत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे तसेच आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी हे देखील आंदोलनांद्वारे लक्ष वेधून आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीमध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघातून अकरा उमेदवार रिंगणात होते.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपआमदार संजय सावकारे यांचेच भाजपकडून नाव आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट ) पक्ष भुसावळची जागा मिळावी त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या पक्षाकडून रमेश मकासरे तसेच राजू सूर्यवंशी हे इच्छुक आहेत.कॉँगे्रस व अन्य पक्षराष्ट्रवादीसोबतच बहुजन वंचित आघाडीकडूनही अ‍ॅड.राजेश झाल्टे यांचे प्रयत्न आहे. भारिप-बहुजन महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, कॉँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे, डॉ . वैशाली गाढे - सोनार तर पीआरपीकडून जगन सोनवणे हे निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसया पक्षाकडून गेल्या वेळी अ‍ॅड. राजेश झाल्टे यांना उमेदवारी मिळाली होती. यावेळीदेखील पक्षाकडून अ‍ॅड.राजेश झाल्टे तसेच उल्हास पगारे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.