शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळला पुन्हा गावठी कट्टा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:20 IST

कोम्बींग आॅपरेशन : दोघे अटकेत, कारही जप्त

भुसावळ : शहरात गेल्या दोन-तीन महिन्यात गावठी कट्टे सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र गेल्या आठवड्याापासून पुन्हा गावठी कट्टे सापडण्यास प्रारंभ झाला आहे . त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे . शनिवार रोजी खुनाच्या आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. तर यानंतर बाजारपेठ पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन करून रविवार रोजी दोघांना गावठी कट्टयाससह अटक केली आहे .८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास शहरात शिरपूर - कन्हाळा रोड वरील घोडेपीर बाबा दर्गा जवळ सार्व.जागी एका लाल रंगाची कार (एम . एच. ४३ - एन -६३५०) मधील इसमाजवळ गैरकायदा गावठी कट्टा असल्याची गुप्त बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड याना मिळाली. यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, स. पो.निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, स. फौ. तस्लिम पठाण, पो. हे .कॉ. सुनील जोशी, पो.ना. रविंद्र बिºहाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील,नेव्हिल बाटली, पो. कॉ. विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईस्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी सदरचे वाहन अंधारात उभे असल्याचे पाहून त्यास चोहो बाजूने सपळा रचून दीपक संजय चौधरी ( ३५ ) रा.रामदेव बाबा मंदिर जवळ भुसावळ, ह मु लोणवाडी ता. बोदवड व कुंदन रामदास वानखेडे (२५ ) रा.रामदेव बाबा मंदीर जवळ भुसावळ यांना पकडले.यावेळी कुंदन वानखेडेच्या कमरेला दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळाला तर ६० हजार रुपये किमतीची लाल रंगाची कार जप्त करण्यात आली असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.