शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भुसावळमध्ये ५३ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST

भुसावळ : ‘ लोकमत रक्ताचे नातं’ या उपक्रमाला शनिवारी भुसावळ येथे डॉक्टर्स व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात ...

भुसावळ : ‘ लोकमत रक्ताचे नातं’ या उपक्रमाला शनिवारी भुसावळ येथे डॉक्टर्स व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात ५३ जणांनी रक्तदान करून महायज्ञास हातभार लावला.

आयएमए भुसावळ, महिला पर्यावरण सखीमंच, निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ भुसावळ, तसेच तालुका यांच्या वतीने लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयएमए हॉल भुसावळ येथे रक्तदान शिबिर झाले.

यावेळी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, आयएमएचे सचिव डॉ.वीरेंद्र झांबरे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव सोनू मांडे, महिला पर्यावरण सखीमंचच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा पाटील, नगरसेवक मुकेश गुंजाळ, राज्य समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष नाना पाटील, रघुनाथ सोनवणे, जे.बी कोटेचा, राज्य सल्लागार सुरेंद्रसिंग पाटील, एमआयएम जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, संदीप सुरवाडे, अतुल पाटील व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

मुकेश गुंजाळ यांनी १४व्या वेळी तर दिनेश नेमाडे यांनी १३व्या वेळी तर संदीप सुरवाडे यांनी ८ वेळा रक्तदान केले. रक्तदात्यांना इंदरचंद चोरडिया यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त सीताफळ, गुळवेल, अडुळसा हे वृक्ष भेट देण्यात आले.

डॉक्टर व महिलांची लक्षणीय उपस्थिती

रक्तदान शिबिरात तब्बल १८ डॉक्टर्स व १२ महिलांनी रक्तदान केले. शालिनी वाडेकर, आरती चौधरी, सारिका फालक, भारती पाटील, शीतल अरोडा, डॉ.वैशाली निकु़ंभ, काजल सेन, रूपाली पाटणकर, विद्या पाटील, रेखा सोनवणे, महानंदा पाटील, जयश्री महाजन, अनिता आंबेकर, विद्या पाटील, एकता कुमारी भगत, आरती भरवसे, राजश्री नेवे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन नाना पाटील यांनी केले.

फोटो ओळ

रक्तदात्यांना वृक्ष व प्रमाणपत्र भेट देताना प्रमोद नेमाडे, सोनू मांडे, रघुनाथ सोनवणे, डॉ.वीरेंद्र झांबरे, जे.बी.कोटेचा, नाना पाटील, अमित

शिंदे, वासे़फ पटेल आदी.

चौकट

आज चार ठिकाणी रक्तदान शिबिर

भुसावळ

'लोकमत' परिवार, आयकॉन हॉस्पिटल, भुसावळ पोलीस व पालिका यांच्या वतीने आयकॉन हॉस्पिटल, भुसावळ ब्लड बँकेच्या वरच्या मजल्यावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान रक्तदान शिबिर होईल. रक्तदान करणाऱ्यांना रोप भेट दिले जाईल.

चोपडा

चोपडा येथे रोटरी क्लब आणि लोकमत यांच्या वतीने पंकज माध्यमिक विद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान रक्तदान शिबिर होईल.

धरणगाव

धरणगाव येथील विक्रम वाचनालय व ग्रंथालय, भाटिया गल्ली येथे सकाळी १० वाजेपासून रक्तदान शिबिर असेल.

नगरदेवळा

लोकमत, सरदार एस.के.पवार विद्यालय व छत्रपती शिवराय बचत गटातर्फे सरदार पवार शाळेच्या सभागृहात सकाळी ९ वाजेपासून रक्तदान शिबिर असेल.