शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भुसावळच्या लाचखोर पोलिसाला अटक

By admin | Updated: May 30, 2014 13:16 IST

बोदवड ते जळगाव या दरम्यान वाळूची वाहतूक करीत असताना पकडलेल्या ट्रकचा वाहन परवाना व रॉयल्टीच्या पावत्या परत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी शरीफ नजीरखॉ तडवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी जळगावात अटक केली.

जळगाव : बोदवड ते जळगाव या दरम्यान वाळूची वाहतूक करीत असताना पकडलेल्या ट्रकचा वाहन परवाना व रॉयल्टीच्या पावत्या परत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी शरीफ नजीरखॉ तडवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी जळगावात अटक केली. तक्रारदार यांची ट्रक क्रमांक एमएच १९ बी एम १०१० व त्यांच्या मित्राचा ट्रक नंबर एमएच १९ झेड ९०९० हे वाळू भरून २९ रोजी रात्री जळगाव येथून बोदवडकडे जात होते. या दरम्यान पोलीस कर्मचारी शरीफ तडवी याने हे ट्रक कुर्‍हे पानाचे या गावाजवळ ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ट्रकचा वाहन परवाना तसेच रॉयल्टीच्या पावत्या जप्त केल्या. तसेच कारवाई टाळण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी तडवी याने दोघांना दहा हजारांची रक्कम घेऊन जळगावला बोलविले.तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना भास्कर मार्केट जवळील एलआयसीच्या कार्यालयाजवळ पाठविले. या ठिकाणी शरीफ तडवी याला दहा हजार रुपयांची लाच घेतांना या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी शरीफ तडवी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपअधीक्षक डी.डी.गवारे करीत आहेत.