पारोळा : तालुक्यातील ३८ गावे ही अमळनेर मतदारसंघात जोडली गेली, तेव्हापासून या गावांशी सामाजिक बांधीलकी वाढली आहे. बोदर्डे गावाला विकासासाठी निधी अपूर्ण पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी बोदर्डे वंजारी ग्रामस्थांच्या सत्कारप्रसंगी केले.
बोदर्डे व वंजारी गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जळगाव यांच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी अमळनेर रोड ते बोदर्डे गावापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण १.६० कि.मी., ८०.३८ लक्ष व पारोळा ते वंजारी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण १.५० कि.मी,८०.२५ लक्ष रुपयांचे कामाचे भूमिपूजन बोदर्डे -वंजारी येथे करण्यात आले.
प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, अमळनेरचे माजी नगराध्यक्ष एल.टी. पाटील, जि. प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, उद्योगपती व महाळपूरचे सरपंच सुधाकर पाटील, प्राचार्य एस. व्ही. पाटील, भोकरबारी सरपंच राहुल पाटील, खेडीढोक उपसरपंच बाळू पाटील, प्रदीप राजपूत, दिगंबर पाटील, दगडी सबगव्हाण सरपंच नंदलाल पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अनिल चौधरी यांनी मानले.