तांडा ही वस्ती जळगाव जिल्ह्यातील मराठवाडा हद्दीवरील शेवटचे टोक असून, येथून १०० मीटर अंतरावरून मराठवाड्याची हद्द सुरू होते. तसेच संपूर्ण गाव बंजारा समाजाचे आहे. येथे मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असून, आता पहिली ते आठवीपर्यंत येथील मुले येथीलच जि. प. शाळेत दर्जेदार शिक्षण घेताना दिसतात. पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असताना दोनच शिक्षक आहेत.
भूमिपूजन कार्यक्रमाला उपसभापती अनिता पवार, सरपंच भरत राठोड, उपसरपंच रज्जाक तडवी, शिंदाड येथील उपसरपंच नरेंद्र पाटील, मुंबईहून आलेले प्राचार्य संजय पाटील, डॉ. सुकलाल चव्हाण, मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील, पी. पी. पाटील, संजय मालकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश डांबरे, आप्पा पाटील, सुभाष पाटील, सत्तार तडवी, सतीश पाटील, विष्णू पवार ग्रामस्थ देविदास चव्हाण, राजाराम चव्हाण, विकास राठोड, गणेश चव्हाण, कैलास राठोड, चेअरमन संजय चव्हाण, ग्रामसेवक के. डी. पवार, गोपाल चिंचोले आदी उपस्थित होते.