शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील वरणगाव पालिका सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:51 IST

वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पालिकेची विशेष सभा झाली. त्यात नगरसेवकांनी प्रश्नांचा ...

ठळक मुद्देबांधकाम अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यास धारेवर धरलेपालिका प्रशासनाकडून सावरासावर करीत विशेष सभेचे आयोजन

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पालिकेची विशेष सभा झाली. त्यात नगरसेवकांनी प्रश्नांचा भडीमार करून बांधकाम अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यास धारेवर धरले.गेल्या १० डिसेंबर रोजी झालेल्या सभेत कामाच्या निविदा न उघडताच त्यातील निविदांना चर्चेविना सभागृहाने बहुमताने मान्यता दिली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे निविदा उघडल्या गेल्या नसल्याची माहिती नगरसेवकांच्या एका गटास मिळाल्याने त्यांनी याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. पालिका प्रशासनाने सावरासावर करीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.पालिका प्रशासनाने निविदा उघडली की नाही? याबाबत सर्व सदस्यांना अंधारात ठेवून सभेच्या पटलावर निविदेचे विषय मांडून बहुमताने मंजूर करून घेतले होते, ही बाब उघड झाल्याने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवल्याने सभेत नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आजच्या २३ विषयांपैकी आठ विषयांना सभेने मंजुरी तर निविदेच्या बाकी विषयावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे गटाने उच्च न्यायालयात धाव घेत, निविदा मंजुरीच्या विषयावर स्थगिती मिळविल्याने ते विषय सभेत चर्चेला घेतले गेले नाही. सभेस सर्व नगरसेवक उपस्थित होते.विकास कामांच्या निविदांवर विरोधकांनी उच्च न्यायालयात स्थगिती मिळविल्याने शहरातील तीन कोटींच्या कामाला खीळ बसली. शहराचा विकास थांबविण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहे. याचे दु:ख होते.-सुनील काळे, नगराध्यक्ष, वरणगावआमचा विकासाला आळा नाही. परंतु पालिका प्रशासनाने नगरसेवकांना अंधारात ठेवून निविदा न उघडता मंजुरी घेतल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली.-नितीन माळी, नगरसेवक, न.पा., वरणगाव

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ