शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भवरलाल जैन अनंतात विलीन

By admin | Updated: February 28, 2016 00:16 IST

जैन हिल्स परिसर नि:शब्द : अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर

जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्यावर शनिवारी दुपारी ४.२१ वाजता जळगावमधील जैन हिल्सवर शासकीय इतमामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ सुपुत्र अशोक जैन यांनी मुखाग्नी दिला. यावेळी त्यांचे पुत्र अनिल, अजित व अतुल जैन तसेच दलिचंद जैन व कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे देश-विदेशातील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जैन यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवून अंत्यसंस्काराच्या चौथर्‍यानजीक आणण्यात आले. यानंतर तीन फैर्‍या झाडून सलामी देण्यात आली. तसेच शहीद, देशभक्तांच्या निधनानंतर वाजविण्यात येणारी धून पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी वाजविली. यावेळी जैन हिल्स परिसर नि:शब्द झाला होता. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, सेबीचे (सिक्युरिटी ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) माजी अध्यक्ष डी.आर.मेहता, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, अमरावती महसूल विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्यासह अर्थ, सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यापार, शेती आदी क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. तसेच जिल्ह्यासह मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी ठिकाणचे शेतकरी, जैन यांचे चाहते अंत्यसंस्काराला उपस्थित होते. रुग्णालय व जल व कृषि विद्यापीठ उभारणार व ५० गावांमध्ये शुद्धपाणीपुरवठाभवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ, त्यांची अपूर्ण राहीलेली इच्छा म्हणून जिल्ह्यात मुंबई, पुणेच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्याची घोषणा भवरलाल जैन यांचे पुत्र अनिल जैन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केली. तसेच जिल्ह्यात वर्षभरात जन्मगाव वाकोदसह ५० गावांमध्ये पाणी शुध्दीकरण तंत्रज्ञान पोहोचविणार, जल व कृषि विद्यापीठ स्थापन करण्यासह प्रयोगशील शेतकर्‍यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येईल, असेही अनिल जैन यांनी अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमात जाहीर केले.