शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बºहाणपूर-धुळे एसटी बसमधून भुसावळला चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीसह मद्यसाठा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 17:21 IST

रावेर : चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी केला १२ हजार ६०० रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

रावेर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले असल्याने मद्यविक्री बंद असताना चोरवड या मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने २२ रोजी बºहाणपूर-धुळे एसटी बसमधून १२ हजार ६०० रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला.बºहाणपूरहून सुटलेली बºहाणपूर-धुळे एसटी बस (क्रमांक एमएच-४०/एन-९०३९) चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर पोहोचली. लोकसभा निवडणुकीनिमित्त तैनात असलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सदर बसची झडती घेतली. त्यात स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख नवाब तडवी, कॅमेरामन योगेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मसरोद्दीन शेख व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी कसून झडती घेतली. त्यांना राहुल बेलचंद पटेल (वय २४, रा इतवारा गेट वार्ड क्रमांक १९, बºहाणपूर) याच्या सीटखाली काळ्या व तपकिरी रंगाच्या दोन बॅगा आढळल्या. त्या कोणाच्या आहेत? अशी चौकशी केली असता उभय आरोपीने त्याच्या मालकीच्या असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बॅगांची तपासणी केली असता त्यात १२ हजार ६०० रुपये किमतीच्या १८० मि.ली.च्या प्रत्येकी ४५-४५ विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. आरोपीस स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पोलीसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन रावेर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर घडली.मद्यसाठा बेकायदेशीररित्या चोरट्या मार्गाने भुसावळ येथे नेण्यासाठी अवैध वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बिजू जावरे, पो.कॉ.नीलेश चौधरी तपास करीत आहेत.