शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर योजनेचा १० हजार लोकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:14 IST

जामनेर तालुका: रेशन कार्ड नसलेल्यांना तांदुळ वाटप

जामनेर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्थापित मजूर व रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ व प्रती कुटंब एक किलो हरभऱ्याचे वाटप सुरू केले आहे. याचा तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे अधिक हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यात अनेकांचे रेशनकार्ड नसल्याने अन्नधान्यासाठीही त्यांची फरफट होत आहे. काही सामाजिक संस्थाकडून मदतीचा हात देण्यात आला, मात्र आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांच्या समस्या कायम आहेत. त्यात परजिल्ह्यातील व परराज्यातील विस्थापित मजुरांची संख्याही मोठी आहे. ही बाब पाहता शासनाच्या वतीने यापूर्वी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय कुटुंब लाभार्थी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने आता आत्मनिर्भर भारत वित्तीय साहय्य पॅकेज अंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरजूंना प्रती किलो पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो हरभरा वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन, जुलै, या दोन महिन्यांसाठी हे धान्य पुरवठा करण्यात येत आहे.या योजनेतील लाभार्थ्यांची महसूल प्रशासनाने निवड केली असून तालुक्यातील रेशनकार्ड नसलेले व विस्थापित मजूर असे जवळपास १० हजार नागरिकांना याचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा फक्त तांदूळ महसूल प्रशासनाकडे उपलब्ध झालेला आहे. शहरातील दोन स्वस्त धान्य केंद्र व तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयमार्फत हे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. तांदूळ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी स्वस्तधान्य दुकानांना भेटी देत आहेत. धान्याच्या वितरणाचा आढावाही घेतला जात असून धान्याबाबत काही तक्रारी असतील तर संपर्क साधावा असे आवाहनही महसूल विभागाने केले आहे.आधारमुळे मिळणार खºया लाभार्थ्यांना धान्य...धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकानुसार थम घेतले जाणार आहे थम प्रक्रियेत ज्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी संलग्न केलेला नाही किंवा ज्यांना यापूर्वी लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थींची माहिती मिळणार आहे, आधार लिंकिंगमुळे खºया गरजू लाभार्थ्यांना या धान्याचे वाटप होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना वाटप करण्यासाठी अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला आहे आत्मनिर्भर योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. आत्मनिर्भर योजनेतील लाभार्थ्यांनी आपापल्या हद्दीतील दुकानांमधून तांदूळ घ्यावा.-अरुण शेवाळे, तहसीलदार जामनेर