शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळीराजा सरसावला

By admin | Updated: September 11, 2015 21:42 IST

दुष्काळी स्थितीचा अडथळा नाही तळोद्याच्या आठवडे बाजारात मोठी उलाढाल

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात काहीशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असतानाही आयुष्यभर आपल्या मालकासाठी मेहनत करणा:या सर्जा-राजाचे पूजन करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. शुक्रवारी तळोद्याचा बाजार असल्याने या दिवशी ग्रामीण भागातून बळीराजा मोठय़ा प्रमाणावर बैलजोडीच्या सजावटीसाठी लागणारे गोंडे, नाथ, घुंगरू, मोरखे, शिखे, तसेच रंग ह्या वस्तू खरेदीसाठी बाजारात दाखल झाल्याचे चित्र होते.सध्या ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर ट्रॅक्टरने मशागत होत असल्याने बहुतांश शेतकरी बैलजोडी ठेवत नाही. तळोदा तालुक्यातील सपाटीच्या गावांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या बैलजोडय़ा असल्याचे दिसून येते. सातपुडा पायथ्यालगतच्या गावांमधील रोझवा पुनर्वसन वसाहतीत सर्वाधिक दीडशेच्यावर बैलजोडय़ा आजही आहेत. गावात प्रत्येक शेतक:याकडे बैलजोडी आहे. तर काहींकडे दोन बैलजोडय़ा आहेत. या वसाहतीत पोळ्याच्या दिवशी सर्जा-राजाला सजवण्यासाठी जणू स्पर्धाच लागते. पुनर्वसन वसाहतीतील काही अल्पभूधारक शेतकरी आपली शेतीची कामे आटोपून रांझणीसह परिसरात शेती मशागतीच्या कामासाठी बैलजोडीसह औत पाचशे रुपये प्रती दिवस देत असतात. त्यामुळे शेतीसोबत त्यांना सर्जा-राजामुळे चांगलाच रोजगार उपलब्ध होत असतो.गावात भरपूर बैलजोडय़ा असून, रांझणी परिसरातून भाडय़ाने बैलजोडय़ा, औत घेणारे येत असतात. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध होत असल्याने सर्जा-राजा शेतीचे कामे करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आर्थिक अडचण भासू देत नसल्यामुळे त्याचे पूजन व पोळा सण दरवर्षी मोठय़ा उत्साहात साजरा करतो.