शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सावदा येथे बियर बार, परमिट रूम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 08:24 IST

सावदा येथे चोरट्यांनी बियर बार, परमिट रूम फोडले.

ठळक मुद्देपाच लाखांची दारू चोरलीदारूचा प्रताप की दुसरेच आणखी काही

फैजपूर, ता.यावल, जि. जळगाव : सावदा वाघोदा रोडवरील हिना पॅलेस बीअर बार व परमिट रूम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून तब्बल पाच लाखांची विदेशी दारू व बियरच्या बाटल्या दारू लंपास केल्याची घटना ३० रोजी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून या चोरी मागील रहस्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.रावेर वाघोदा रस्त्यावरील पेट्रोलपंपाशेजारी हिना पॅलेस बीअर बार व परमिट रूम आहे. सध्या लॉकडाउनमुळे बिअरबार, परमिट रूम हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सील करण्यात आले आहे. तसेच हिना बारसुद्धा सील करण्यात आले होते. मात्र दि. २९ च्या मध्यरात्री हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्याला  सील  असतानासुद्धा अज्ञात चोरट्यांनी लोखंडी चैनल गेटची कडी कापून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यातून चार लाख ६७ हजार ४०० रुपयाची विविध कंपन्यांची विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या तसेच डीव्हीआर चोरून नेला. ही घटना दि.३० रोजी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी हॉटेल मॅनेजर कृष्णा सुधाकर गोष्टी यांनी खबर दिलली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मुक्ताईनगरचे डीवायएसपी सुरेश जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली, तर राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन स्टॉक रजिस्टर चेक केल्यानंतर हॉटेलमधून चार लाख ६७ हजार ४०४ देशी, विदेशी दारूच्या तसेच बिअरच्या बाटल्या चोरी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेचा तपास सपोनि राहुल वाघ करीत आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सावदा तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारूची अवैध विक्री होत आहे. हा माल येतो कुठून याचीही पोलिसांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच या चोरी मागे काही गौडबंगाल तर नाही, असाही संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ही दारू सद्य:स्थितीत अवैधरित्या विकली गेली असल्यास तिची किंमत १५ ते२० लाखाच्या जवळपास असल्याचे समजते.दरम्यान, राज्य उत्पादन शुल्कचे के.एन. बुवा यांच्या पथकाने तपासणी केली.