शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

नशिराबादचे डॉ.भंगाळे देताय वृक्षसंवर्धनाचा संदेश नशिराबाद : सद्यस्थितीला कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रूग्णांना आपले प्राण ...

नशिराबादचे डॉ.भंगाळे देताय वृक्षसंवर्धनाचा संदेश

नशिराबाद : सद्यस्थितीला कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले. परिणामी, आता ऑक्सिजनची खरी किंमत प्रत्येकाला कळत आहे. त्यामुळे प्रत्येक आजारी रुग्णाच्या चिठ्ठीवरचं आजारातून बरे झाल्यावर एक झाड अवश्य लावा, म्हणजेचं तुम्हाला व येणा-या तुमच्या पिढीला भविष्यात ऑक्सिजनची कमी पडणार नाही, अशी सूचना देऊन जनजागृतीचे काम नशिराबाद येथील डॉ.आशुतोष भंगाळे करीत आहेत.

नशिराबाद येथील साई गजानन क्लिनिकचे डॉ.आशुतोष भंगाळे यांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधांच्या जोडीनं लिहिलेला मजकूर सध्या आवडीने वाचून तसे नागरिक करीत आहेत. औषधांची नावे आणि ती कशी घ्यायची हे लिहिल्यानंतर खालच्या बाजूला आजारातून बरे झाल्यावर एक झाड अवश्य लावा. म्हणजेच तुम्हाला व पुढील पिढीला भविष्यात ऑक्सिजनची कमी पडणार नाही, असा मजकूर भंगाळे यांनी लिहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अखेर नागरिकांना ऑक्सिजनचे महत्व पटले आहे. डॉक्टरांनी सुध्दा आता त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरून जनजागृतीपर संदेश देत आहे. डॉक्टरांनी सांगितले, तर प्रत्येक बाब रूग्ण एकतोच. त्यामुळे चिठ्ठीवर लिहिल्याप्रमाणे बरे झाल्यानंतर रूग्ण झाडे लावतील व त्याचा उपयोग स्वत:साठी व इतरांसाठी देखील होईल. तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी सुध्दा मदत होईल. डॉ. आशुतोष भंगाळे यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. तसेच त्यांच्या बॅचमधील सर्व डॉक्टरांनी जनजागृती करण्‍याचा संकल्प केला असल्याची माहिती भंगाळे यांनी दिली.