शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आजाराबाबत बालमनावरील परिणामांची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:22 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसलेल्यांमध्ये कोरोनाची भीती, चिंता, दु:ख वाटते. कधी चिडचिडही होते. अशा वेळी बालमनावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे व त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंडे स्पेशल.....डॉ.राजेश सोनवणे यांचा ‘लोकमत’शी संवादकॉलनी परिसर, नातेवाईक, मित्र मंडळ यांच्या ग्रुपवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित कराआपल्या डॉक्टरांकडून व्हाट्सअ‍ॅपच्या किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वेळीच उपचार करून घ्या

मोहन सारस्वत/लियाकत सय्यदजामनेर, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसलेल्यांमध्ये कोरोनाची भीती, चिंता, दु:ख वाटते. कधी चिडचिडही होते. घरातील व्यक्तीची ही चिडचिड होते किंवा फोनवर आजाराबद्दल चर्चा होते. अशा वेळी बालमनावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे व त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.मुलांनी प्रश्न विचारले तर त्यांना रागावू नका किंवा चिडचिडही करू नका. शांतपणे आपणास याविषयी जेवढी माहिती आहे ती सोप्या शब्दात सांगा. त्यांच्या शंकांचे निरसन करा. याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत सांगून त्यांना आश्वस्त करा. मुले जर प्रश्न विचारण्याइतके मोठे नसतील तर त्यांच्या वागण्यात बदल झालेला आपणास दिसून येईल. अशा वेळी जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवावा. त्याच्यासोबत बालपणीचे खेळ खेळा. मुलांचे छंद कोणते आहेत? कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे ते हेरून कलागुणांना वाव देऊ शकतो.कॉलनी परिसर, नातेवाईक, मित्र मंडळ यांच्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित करा. मुलांना डानसिंग, योग, सोप्या हालचाली शारीरिक व मानसिक व्यायाम करून घेतल्यास आपण त्यांना व्यस्त व तंदुरुस्त ठेवू शकतो.लहान मुलांना सर्दी, पडसे किंवा ताप यासारखे आजार होऊ शकतात. त्यावर आपल्या डॉक्टरांकडून वेळीच सोशल डिस्टनसिंग किंवा व्हाट्सअ‍ॅपच्या किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वेळीच उपचार करून घ्यावा, असेही डॉ.सोनवणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर