शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

नवसाच्या विरांना केले ‘बट्टी’ने ‘शांत’

By admin | Updated: April 2, 2017 18:10 IST

प्रा. हरीश पाटील व प्रा.शैलेश पाटील या बंधूंनी प्रथेप्रमाणे बोकड आणाला व त्याला मिरवून सोडून दिले आणि उपस्थितांना वरण- बट्टीचे जेवण देत एक आदर्श निर्माण केला आहे.

बळी प्रथेला फाटा : पिंपरखेडच्या पाटील बंधुंनी बोकडास सोडले जिवंत

पिंपरखेड ता.भडगाव, दि.2- चैत्र  महिना आला की डोळ्यासमोर येतो नवस, शेंडीचा तसेच विराचा कार्यक्रम. अनेक कार्यक्रमात तर बोकड बळी ठरलेलाच असतो मात्र येथील विराच्या कार्यक्रमात प्रा. हरीश पाटील व प्रा.शैलेश पाटील या बंधूंनी प्रथेप्रमाणे बोकड आणाला व त्याला मिरवून सोडून दिले आणि उपस्थितांना वरण- बट्टीचे जेवण देत एक आदर्श निर्माण केला आहे.
पिंपरखेडचे प्रा.हरीश सुरेश पाटील यांचा मुलगा केतन व प्रा.शैलेश सुरेश पाटील यांचा आदित्य यांचा विरांचा शेंडी  उतरवण्याचा 2 रोजी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम म्हटला म्हणजे खान्देशात डोळ्यासमोर एक दृष्य समोर येते ते म्हणजे बोकड, दारु व सैराट नाचणारे. परंतु प्रा.हरिश पाटील व प्रा.शैलेश पाटील यांनी गावात नवीन पायंडा पाडला आणि तो म्हणजे या  कार्यक्रमात बोकड आणाला परंतु त्याची हत्या न करता त्याला जिवंत सोडून देत एक प्रकारे मुक्या प्राण्याला जीवदान दिले.
सकाळी वाजतगाजत त्या बोकडाची गावातून मिरवणूक काढण्यात आली नंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यांनी याप्रसंगी बोकडाचा बळी न देता वरणभात बट्टी, वांग्याची भाजी व गोड शिरा  असे जेवण उपस्थितांना दिले. यावेळी आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही हजेरी लावली.
 
खान्देशात बोकड बळी प्रथा बंद करीत नवीन आदर्श या कार्यक़्रमातून घडला. ही प्रथा नवीन पिढीसाठी एकप्रकारे प्रेरणादायी ठरणार आहे.
-अॅड. विश्वासराव भोसले, संचालक बाजारसमिती संचालक, पाचोरा
 
आजच्या या निर्णयामुळे दारु पिणे व बोकड कापणे हे थांबण्यासाठी. समाजाने हा आदर्श सतत नजरेसमोर ठेवावा.
- विद्याधर पाटील, स्कूल कमेटी चेअरमन
 
आजची पिढी व्यसनाधीन होत आहे.  अशी नवीन प्रथा पाडून निश्चित  युवा पिढीत सुधारणा होईल.
- विलास पाटील, पोलीस पाटील 
 
 प्रा.हरिश पाटील  यांनी गावासाठी अहिंसेचा मार्ग दाखवला आहे.  याचे सर्व गावक:यांनी कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
-  नितीन पाटील, माजी सरपंच