शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गावठी पिस्तुलचा धंदा सुरुच

By admin | Updated: September 30, 2015 00:29 IST

जळगाव : जिल्ह्यात गावठी पिस्तुलची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी पुन्हा अजय सैंदाण या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून पिस्तुलसह ताब्यात घेतले.

जळगाव : जिल्ह्यात गावठी पिस्तुलची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या आठवडय़ात जामनेर व वाकोद येथून दोन गावठी पिस्तुलसह आरोपींना पकडल्यानंतर मंगळवारी पुन्हा अजय रमेश सैंदाणे (वय 26, रा.मल्हारपुरा, चोपडा) या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून पिस्तुलसह ताब्यात घेतले. त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा येथे एका तरुणाकडे गावठी पिस्तुल असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली होती.

त्यानुसार रायते यांनी सहायक फौजदार मुश्ताक अली सैयद, मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, अशोक चौधरी, ईश्वर सोनवणे, योगेश पाटील, मनोज दुसाने, दर्शन ढाकणे, गायत्री सोनवणे व छाया मराठे आदींचे एक पथक तयार चोपडा येथे पाठविले.

मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव चौफुलीवर पथकाने सापळा लावला. अजय हा दुचाकीने (एम.एच.19 बी.एच.3058) निघण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात पंधरा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आढळून आले. चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्याला पिस्तुल व दुचाकीसह जळगावला आणण्यात आले. यापूर्वीही त्याच्यावर 395 चा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले.

 

मध्य प्रदेशातून होते तस्करी

गावठी पिस्तुलची तस्करी मध्य प्रदेशातून होत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या कुशीतील काही गाव तसेच मध्यप्रदेशात उमर्टीसह आणखी काही गावांमध्ये पिस्तुल बनविले जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ऑर्डरनुसार यावल, रावेर व चोपडा मार्गे हे गावठी पिस्तुल जिल्ह्यात आणले जातात. या तस्करीत दलालही सक्रीय असल्याचा संशय आहे.