शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

४२ कोटी ५० लाख खर्चून ग्रामीण भागात मिळणार मूलभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध कामांसाठी ४२ कोटी ५० लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध कामांसाठी ४२ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी जिल्ह्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.

राज्य शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जिल्ह्यातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४१७ कामांकरिता ३३ कोटी ५० लाख तर जिल्हा परिषदकडे २५९ कामासाठी ९ कोटी असा एकूण ६७६ कामांसाठी ४२ कोटी ५० लाखांच्या निधीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

मंजूर कामे

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये सभामंडप, मल्टीपर्पज हॉल, रस्त्यांवर व चौकाचौकात पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ते काँक्रिटीकरण, गटार बांधकाम, रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभिकरण, स्मशानभूमी बांधकाम व ॲप्रोच रस्ते, शेड बांधकाम, हायमास्ट लॅम्प बसविणे, गावांतर्गत छोटे पूल व मोऱ्या बांधकाम, सभागृह बांधकाम अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.