शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पातोंडा येथे सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने बडोदा बँक १५ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:02 IST

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखा १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बँकेस दिले आहेत.

ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांचे बँकेला आदेशबँकेने उन्हासाठी टाकला होता मंडप

पातोंडा, ता.अमळनेर, जि.जळगाव : सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखा १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बँकेस दिले आहेत.पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखेत खातेधारकांनी सोमवारी सकाळी पैसे काढण्यासाठी एकाचवेळी तोबा गर्दी केल्याने झुंबड उडाली. बँक ग्राहकांकडून कोरोना प्रादुर्भाव संदर्भात सामाजिक अंतर व शासकीय आदेशाची पायमल्ली होत असल्याचे पाहून व बँकेच्या प्रांगणात खातेधारकांचे यात्रेचे स्वरूप आढळून आले. शेवटी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी तत्काळ गंभीर दखल घेत ही बँक १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे लेखी आदेश शाखा व्यवस्थापक अमोल पोपटघट यांना दिले.येथील बँक आॅफ बडोदा शाखा मोठी आहे. पातोंडा, नांद्री, दापोरी, खवशी, मठगव्हाण, रुंधाटी, गंगापुरी, नालखेडा, मुंगसे आदी १५-२० गावातील मोठ्या प्रमाणात खातेधारकाची संख्या असून येथे नेहमी गर्दी असते. लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्व नागरिकांना विशेषत: मजुरी करणाºया नागरिकांना घरी बसून एक महिना होत आलेला आहे. त्यातच दैनंदिन खर्चासाठी पैसे हवेत म्हणून आणि त्यातच केंद्र सरकारने जनधन खातेदारांच्या खात्यात तीन महिने प्रति महिना पाचशे रुपये देण्याची अंमलबजावणी झालेली असताना पहिला हप्ता व विविध शासकीय योजनांचे पैसे काढण्यासाठी शेतकरी, वृद्ध महिला पुरुषांनी सकाळपासून बँकेबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली.नोटाबंदीच्या काळात खातेधारक पायातील पादत्राणे काढून नंबर लावण्याची पद्धत पुन्हा वापरताना दिसून आली. शाखा व्यवस्थापक पोपटघाट यांनी उन्हाचे दिवस असल्याने खातेधारकांना उन्हाची तीव्रता जाणवायला नको म्हणून मंडप टाकून दिला. मात्र नागरिकांनी सर्व सुविधांचा बोजवारा करत एकमेकांवर तुटून पडतील, अशी गर्दी केल्याने शासकीय आदेशांची पायमल्ली केली.१५ दिवस बँक बंद राहणार तर बँक ग्राहकांची, गरजू, शेतकरी, मजूर यांची फारच गैरसोय होणार आहे. उपविभागीय अधिकाºयांशी चर्चा केली. त्यांना पोलीस बंदोबस्तात बँक सुरू ठेवण्याबाबत एक मागणी पत्र ग्रामपंचायतीमार्फत तलाठी यांना दिले. बुधवारपासून बँक नियमित सुरू राहणार, खातेदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवावे.-रेखाबाई किशोर मोरे, सरपंच, पातोंडाबँक खातेदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकला. खातेदारांना विनंती करून आम्ही अंतर अंतरावर उभे राहण्याचे नेहमी सांगतो. अन्यथा आज ही वेळ आली नसती. प्रांताधिकाºयांशी भ्रमणध्वनेवरून याविषयी चर्चा झाली. यापुढे बँकेच्या अंतर्गत येणाºया मोठ्या गावांना वार देण्यात आले आहेत. बुधवारपासून नियमित बँक सुरू राहणार आहे. लोकांनीही कोरोनासंदर्भातले नियम पाळावे.-अमोल पोपटघट, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, पातोंडा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर