कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे जैन श्रावक संघाच्या वतीने मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत (नरसिंंगपूर), मुमुक्षु जैनम बोरा (मालेगाव) यांची वरघोडा मिरवणूक दि.१८ रोजी उत्साहात काढण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्याभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेयेत्या २९ जानेवारी रोजी जळगाव येथे प.पु.विमलेशप्रभाजी म.सा. यांच्या सानिध्यात मुमुक्षु सुश्री निमिषाजी यांचा दीक्षा समारंभ होईल, तर दि.३० एप्रिल रोजी प.पु.उत्तममुनीजी म.सा.च्या सानिध्यात मुमुक्षु जैनम बोरा यांची दीक्षा मालेगाव येथे होईल. यानिमित कजगाव जैन श्रावक संघाच्या वतीने वरघोडा मिरवणुकीसह स्वागत, वंदन कार्यक्रम घेण्यात आला.जुन्या गावातील जैन श्रावक संघाचे सदस्य तसेच उद्योजक मांगीलालजी हिरण या घरापासून सकाळी नऊ वाजता वरघोड्यास सुरुवात करण्यात आली सजविलेल्या बग्गीतुन मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत यांची तर मुमुक्षु श्री जैनम बोरा यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.प्रत्येक ठिकाणी औक्षण करण्यात आले. घोषणांनी परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. वरघोडा मार्गावर अनेकांनी चहा, पाण्याची व्यवस्था केली होती. तीन तास ढोल ताशा व डीजेच्या गजरात हा वरघोडा निघाला. शेवटी स्टेशन रोडवरील जैन स्थानक परिसरात स्वागत, वंदन, अभिनंदन कार्यक्रम झाला होता. याप्रसंगी स्वागत गीतासह अनेक महिला, पुरुष, युवक, युवती यांचे धार्मिक विषयावर आधारित नाटिका, गीत, स्तवन व भाषण झाली.याप्रसंगी परिसरातील जैनांचे गुरू, गुरूंनी यांच्या माता पित्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कजगाव जैन श्रावक संघ, जैन युवक मंडळ, भारतीय जैन संघटना, महिला मंडळ, बहु मंडळासह युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून समाज बांधव उपस्थित होते.
दीक्षेनिमित्त कजगाव येथे वरघोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:15 IST
जैन श्रावक संघाच्या वतीने मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत (नरसिंंगपूर), मुमुक्षु जैनम बोरा (मालेगाव) यांची वरघोडा मिरवणूक दि.१८ रोजी उत्साहात काढण्यात आली.
दीक्षेनिमित्त कजगाव येथे वरघोडा
ठळक मुद्देघोषणांनी परिसरात भक्तिमय वातावरणसजविलेल्या बग्गीतून मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत यांची तर मुमुक्षु श्री जैनम बोरा यांची उघड्या जीपमधून मिरवणूक