शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बँक कर्मचा:यांच्या संपामुळे 300 कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 16:52 IST

ग्राहकांचे हाल : 800 कर्मचा:यांचा सहभाग

ठळक मुद्दे300 कोटींचे व्यवहार ठप्प800 अधिकारी, कर्मचारी सहभागी35 शाखांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत

 

जळगाव, दि. 22 - आपल्या विविध मागण्यासांठी स्टेट बँक व राष्ट्रीय बँकांच्या कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 300 कोटींचे व्यवहार ठप्प झाले. या संपात जळगाव शहरातील 800  कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे व्यापारी तसेच सामान्य ग्राहकांचे प्रचंड हाल झाले. थकीत कर्ज वसुलीसाठी संसदीय समितीची सुधारणा लागू करणे, थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदे करावे, प्रस्तावित एफडीआरआय बिल मागे घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी 22 रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात आला होता.  त्यानुसार जळगावात सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ शहरातील सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र आले.  उपस्थित पदाधिका:यांनी मार्गदर्शन केले. 

300 कोटींची उलाढाल ठप्पया संपामध्ये केवळ स्टेट बँक व राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी सहभागी झाले असले तरी खाजगी व सहकारी बँकांचे धनादेशदेखील वटू शकले नाही. जिल्हाभरातील सर्व बँकांचे धनादेश वटू न शकल्याने व इतरही व्यवहार होऊ न शकल्याने तब्बल 300 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हाभरातील राष्ट्रीय कृत बँकांसह खाजगी, सहकारी बँकांचे धनादेश स्टेट बँकेत येतात.  

800 कर्मचारी सहभागीजळगावातील निदर्शनावेळी विभागीय सचिव श्याम पाटील, विजय सपकाळे, बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, मधू अहिरे, प्रसाद पाटील, संतोष कातकाडे, सुधीर पाटील, युनायटेड फोरम ऑफ बँक एम्पॉईज् युनियनचे अध्यक्ष किशोर सुव्रे, पुरुषोत्तम पाटील, विनया जोशी, राजन भावसार, सी.पी. शिंपी यांच्यासह शहरातील सर्व राष्ट्रीयकृत, स्टेट बँकेच्या एकूण 35 शाखांमधील 800 जण सहभागी झाले होते. 

ग्राहकांना फटकामंगळवारी संप असल्याने अनेक ग्राहकांनी सोमवारीच बँकांचे बरीचशी कामे करून घेतली होती. मात्र धनादेश वटणे व व्यापा:यांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा मोठा परिणाम झाला. 

आज पुकारण्यात आलेला संप 100 टक्के यशस्वी झाला असून यात जळगाव शहरातील 800 अधिकारी, कर्मचारी  सहभागी झाले होते. - श्याम पाटील, विभागीय सचिव. 

आज पुकारलेला संप 100 टक्के यशस्वी झाला आहे. यामध्ये शहरातील स्टेट बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.- किशोर सुव्रे,अध्यक्षयुनायटेड फोरम ऑफ बँक एम्पॉईज् युनियनचे