शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा बनतोय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 16:32 IST

आता ही ओळख तरी निर्माण होवू नये

ठळक मुद्देअसे प्रकार जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणारे
हितेंद्र काळुंखेजळगाव- जिल्हा परिषदेत अपहार आणि गलथान कारभाराचे अनेक नुमने पुढे येत राहिल्यताने जिल्हा परिषदेची ओळख आता जणू अपहार आणि गलथान कारभाराचे केंद्र म्हणून झाली आहे. आतापर्यंत अनेक गैरप्रकार समोर आले परंतु काहीच हाती लागले नाही. यामुळे गैरप्रकार करणारे आणि अधिकारी यांचे साटेलोटे आहे का? असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे. एकीकडे असे हे प्रकार चर्चेचे ठरत असताना आता जिल्हा परिषदेत पदाधिकारी तेच अधिकारी यांच्या हमरीमुतरी आणि मारहाणीच्या घटनांनी जिल्हा परिषदेचे वातावरण गढूळ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर सोनवणे व सदस्य पवन सोनवणे या काका- पुतण्या मध्ये एका विषयावरुन जुंपली होती. दोघांनीही एकमेकावर सभ्यता सोडत आरोप- प्रत्यारोप केले. एवढेच नाही तर पवन सोनवणे हे काका प्रभाकर सोनवणे यांच्या अंगावर धावून गेले. इतर सदस्यांनी त्यांना रोखले नसते तर या दोघांमध्ये हाणामारीची वेळ आली असती. गेल्या आठवड्यात बालविकास अधिकारी आर. आर. तडवी आणि बचत गट चालक महिलेचा पती कादर तडवी यांच्यात बचत गट बंद करण्यावरु वाद झाला. एवढेच नाही तर अधिकारी तडवी यांनी आपणास मारहाण केली, अशी तक्रार कादर तडवी यांनी पोलिसात दिली. मात्र आर. आर. तडवी यांनी या घटनेचा इन्कार करीत कादर यांनी आपणासच धमकी दिल्याचे म्हटले आहे. या घटनेत सत्यता काय आहे ? हे ठामपणे हे लगेच सांगता येत नसले तरी असे प्रकार जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणारे आहेत, हे नक्की. या प्रकारानंतर लगेचच दुसºया दिवशी टेंडर वरुन माजी सदस्य व एका महिला सदस्यच्या पतीमध्ये खडाजंगी झाली. वास्तविक नियमानुसार जे होत असेल ते होवू देणे गरजेचे आहे. परंतु असे न होता मी म्हणेल तेच झाले पाहिजे अशी काहींची भूमिका असते. तर काही वेळेस चुकीचेही घडत असले तरी योग्य मार्गाने विरोध होणे गरजेचे आहे.