शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

15 दिवसात केळी दरात 300 ने वाढ

By admin | Updated: January 19, 2017 00:23 IST

आवक घटली : उत्तरेकडून मागणी कायम

जळगाव : कांदेबाग व पिलबाग केळीच्या दरात मागील पंधरवडय़ामध्ये क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या थंडीमुळे केळी परिपक्व होण्यास अधिक कालावधी लागत असल्याने केळीचा बाजारातील पुरवठा जवळपास 30 टक्क्यांनी घटला आहे. तर उत्तर भारतासह मुंबई, ठाणे येथील बाजारपेठेची मागणी मात्र कायम असल्याने ही दरवाढ झाली आहे. मुंबई, स्थानिक, ठाणे येथील बाजारपेठेमध्ये जिल्ह्यात उत्पादित होणा:या 70 टक्के केळीचा पुरवठा केला जातो. तर उर्वरित केळीचा पुरवठा विदर्भ, उत्तरेकडील राज्यांमध्ये होतो. 30 ते 35 दिवसांचा कालावधीही परिपक्वतेस अपुरासध्या केळी परिपक्व होण्यास 30 ते 35 दिवसांचा कालावधी लागत आहे. एरवी किमान 17 ते 20 अंश सेल्सिअस तापमानात 18 ते 20 दिवसांमध्ये केळी परिपक्व होते. मागील दोन-तीन आठवडे थंडी अधिक होती. अर्थातच मागणी कायम व पुरवठा कमी यामुळे केळीचे दर वाढत आहेत. कांदेबाग लागवडीचे प्रमाण यावल, रावेर भागात अत्यल्प आहे. जळगाव व चोपडा तालुक्यातील तापी, अनेर नदीच्या पट्टय़ात केळीची लागवड केली जाते. अर्थातच केळीचे उत्पादनही सध्या कमी असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. 5 जानेवारीपूर्वी कांदेबाग व पिलबाग केळीचे दर क्विंटलमागे 800 रुपयांर्पयत होते. जवळपास आठवडाभर दर स्थिर होते. नंतर दरवाढ व्हायला लागली. 800 वरून 850, 900, 950 अशी दिवसागणिक दरवाढ झाली. मागील काही दिवसांमधील केळीचे दर(दर प्रती क्विंटल व रुपयात)14 जानेवारी        100015 जानेवारी        105016 जानेवारी        105017 जानेवारी        108018 जानेवारी        1110