शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

पाण्याच्या नियोजनावरच ठरते केळी लागवडीचे तंत्र

By admin | Updated: April 7, 2017 17:11 IST

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा

ऑनलाइन लोकमतकेऱ्हाळे,ता.रावेर, दि. 07 -  केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा अपवाद वगळता क्षेत्रफळाच्या तुलनेत लागवड शून्य आहे. भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे.जिल्ह्यातील केळी लागवडीचे एकूण क्षेत्रफळ सन २०१५-२०१६ मध्ये ४८ हजार २८० हेक्टर एवढे होते. २०१६-२०१७ मध्ये त्यात वाढ होऊन ते सुमारे ५१ हजार हेक्टर क्षेत्रफळ इतके झाले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापणारा रावेर तालुक्याची व्याप्ती १९ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रफळ सर्वसाधारण केळीने व्यापले आहे. एवढ्या क्षेत्रफळातील केळी आता पुढे कापणीस सज्ज झाली असून पाणीपुरवठा व उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे.एप्रिल महिन्यात नवीन केळी लागवड करण्यास फारसा शेतकरी धजावत नाही. कारण पावसाळा व हिवाळा या ऋतुमध्ये नवीन केळी व जुनारीमधील रब्बीचे आंतर पीक मका, गहू व हळद,तूर या पिकांचे पाणी भरण्याचे नियोजन करून पाणी देणे शक्य होते. हिवाळ्यातील चार महिन्यांमध्ये केळी बागेला सतत पाण्याची गरज नसते. यामुळे इतर पिकांना पाणी देवून उत्पादन घेणे शक्य होते. मार्च पर्यंत रब्बीतील सर्व हंगाम आटोपून एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये केळी पिकांना सतत पाणी द्यावे लागते. यामुळे नवीन लागवड करण्याकडे लक्ष दिले जात नाही. कारण महिना दीड महिन्यात केळी कापणीतून हातात येणारा पैसा सोडून भविष्यात येणारी केळी खोडी लांब ठेवूनच लागवड केली जाते. याला दुसरे कारण म्हणजे तप्त उन्हाच्या कडक लाटांमध्ये नवीन केळी लागवडची खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा लवकर लागवड करून सुद्धा निम्मे केळी कुजून फेकून द्यावी लागते. जमिनीचे क्षेत्रफळ आज रोजीही अनेक शेतकऱ्यांचे तयार आहे. परंतु पाण्याचे नियोजना अभावी लागवड उशिरा केली जात आहे. रामनवमीला केली जाते लागवड रावेर व यावल तालुक्यात काही भागात रामनवमीनंतर केळी लागवडीचा मुहूर्त काही शेतकरी साधतात याला शेतकरी भाषेत (रामबाग) म्हणून ओळखले जाते. यात बहुतांश तांदलवाडी, वाघोदा, न्हावी या भागात काही प्रमाणात लागवड केली जाते. देशी बियाणे झाले हद्दपार...केळी लागवडीत सध्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या जातीने शेतकऱ्यांना भुरळ घातली आहे. टिश्युच्या प्रथम कापणीनंतर निघणाऱ्या कंद लागवडवर आजही सामान्यत ७० टक्के शेतकरी अवलंबून आहे. या विदेशी जातीने अक्षरश: कहर माजवला आहे. यापूर्वीचे देशी वाण श्रीमंती, अर्धापुरी, वसई, सातमासी श्रीमंती या देशी वाणांची उत्पादक क्षमता कमी असल्याची केवळ ओरड केली जाते. मात्र दर्जा, गोडवी व कोणत्या तरी वातावरणात उन्हामध्ये कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणाऱ्या देशी वाणांच्या जाती विकसीत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिसून आले नाहीत. यामुळे अत्यंत तकलादू व विविध रोगांना बळी पडणाऱ्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या विदेशी जातीला प्राधान्य दिले जात आहे.- केळी लागवडीसाठी रामनवमीचा मुहूर्त. - दर्जा,गोडवी व कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणाऱ्या देशी वाणांच्या जाती विकसीत करण्याची गरज.- टिश्युकल्चर ग्रॅडनेन जातीची शेतकऱ्यांना पडली भूरळ.- श्रीमंती,अर्धापुरी,सातमासी या देशी वाणांचा वापर व्हावा.