शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने केळी कापणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:06 IST

आमदारद्वयींसह पालकमंत्र्यांचे प्रयत्न : जिल्हाभरातील केळी उत्पादकांना दिलासा

चिनावल, ता. रावेर : केळी वाहतुकीत येणारी अडचण दूर झाल्यामुळे गुरुवार पासून केळी कापणीला सुरुवात झाली असून हा माल ट्रकमध्येही भरला जाऊ लागला आहे. शासनाने या मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिली असताना केवळ बाहेरील राज्यात ट्रक्स नेता येत नव्हते. मात्र आमदार शिरीष चौधरी आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर हा प्रश्न सुटू शकला.कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे काढणी योग्य परिपक्व झालेले केळी काढून विक्रीस तयार असताना देशभर लोकडाऊन असल्यामुळे उत्तर भारतातील बाजारपेठा देखील बंद आहेत त्यामुळे केळी बाजारात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होते की काय अशी महाभयंकर परिस्थिती केळी उत्पादक शेतकरी राजावर ओढावली होती. त्यात तोंडावर असलेले हसू आता अश्रूत परिवर्तित होणार असताना केळी फळाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळून नियार्तीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी कोचुर येथील पंकज पाटील व कमलाकर पाटील यांचेसह मोठे वाघोदा, सावदा, उधळी, रणगाव, रायपुर , खिर्डी, निंबोल, ऐनपुर, तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील तर चिनावल खिरोदा, रोझोदा, सावखेडा, कुंभारखेडा, येथील शेतकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांना फोनवरून केली होती. दोघा आमदरांनी लागलीच अ‍ॅक्शन मोडमध्ये येत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकºयांची कैफियत मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याने शेतकºयांबाबतीत संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच पंजाब , उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने केळी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.केळी मजुरांची सुरक्षा ही गरजेचीआजपासून केळी कापणी सुरुवात झाली असली तरी एका मालगाडीवर किमान वीस ते कमाल चाळीस केळी मजूर लागत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांना मास्क व हात मोजे याचे सह सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे असे मत केळी युनियनचे उपाध्यक्ष कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.