- गिरीश महाजनजामनेर : मतदारांमध्ये राष्ट्रवादीला जनाधार राहिला नसल्याने या पक्षाचे नेते बिनबुडाचे आरोप करीत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बालिश आरोप करावे, याचेच आश्चर्य वाटत असल्याची टीका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी केली.इव्हीएमबद्दल पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बालिश आरोप करावे, याचेच आश्चर्य वाटते. इतरांच्या आरोपांची दखल घेण्याइतपत ते मोठे नाही. कोणत्याही निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घ्या, मतदार तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. बारामती जिंकण्याचे ध्येय आहेच, त्यात गैर काहीही नाही, असे महाजन म्हणाले.
अजित पवार यांचे आरोप बालिश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 03:31 IST