शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाचोरा येथे बालाजी रथोत्सव जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:20 IST

ढोलताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात पाचोरा येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला.

ठळक मुद्देयात्रेने फुलले पाचोरा शहरव्यवसायातून मोठी उलाढाल

पाचोरा, जि.जळगाव : ढोलताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला. यात्रेने शहर फुलले होते.बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक दुपारी तीन वाजता सुरू होऊन उशिरा संपली. यावर्षी रथाच्या पुजेचा मान चैतन्य पाटील आणि अश्विनी पाटील या दांपत्याला मिळाला. बालाजी महाराजांच्या रथाला दोर बांधून लोक समूहाद्वारे रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत शहरातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानिमित्ताने जामनेर रोड,शिवाजी चौक, गांधी चौक या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली होती. रथयात्रेत लहान मुलांच्या खेळण्यांपासून विविध हॉटेल्स आणि भांड्यांच्या दुकानांसह वेगवेगळे स्टॉल्स असतात तर सोने चांदी, कपडे आणि भांड्यांच्या दुकानातून मोठी आर्थिक उलाढाल घडते पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामीण भागातून लोकांची मोठी गर्दी या यात्रेस बघायला मिळते.बालाजी महाराजांचा रथबालाजी महाराजांचा रथ हा पाचोरा नगरदेवळा येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला असून रथाची उंची ३० फूट इतकी आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले असून, त्यावर कळस ठेवला जातो. अग्रभागी लाकडी घोडे आणि सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती बसवलेली असते. त्यांच्या दोन्ही बाजूस चोपदार यांच्या मूर्ती उभ्या केलेल्या असतात तर मागील बाजूस राक्षसाच्या मुर्त्या उभ्या केल्या असतात. पुढील भागाच्या कळसाचे खाली परी आणि हनुमान यांच्या मुर्त्या बसवल्या होत्या. रथाचे चारही बाजूस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, ऊस, झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सुशोभित केलेला होता तसेच रथावर विजेची रोषणाई केली केली असल्यामुळे रथ खूपच विलोभनीय भासत होता.बालाजी रथाची आख्यायिकापाचोरा येथील अर्जुन पाटील यांचे वंशज रामा पाटील यांचे भाऊ श्यामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारी करायचे . एकदा ते पंढरपूरला वारीसाठी गेलेले असताना चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातलेला असताना त्यांना श्री बालाजी महाराजांची दगडी मूर्ती त्यांना गवसली. परमेश्वर प्रसन्न झाला या भावनेने त्यांनी ती मूर्ती दिंडीसोबत पाचोऱ्याला आणले आणि हा वृत्तांत आपल्या भावांना सांगितला. श्यामा पाटील यांना मूल बाळ नसल्याने त्यांच्या वाट्याला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री बालाजी मंदिर तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगावराजा येथील पंडित व महंत यांच्याहस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि तेव्हापासून रथाची मिरवणूक उत्सव सुरू झाला.रथ थांबवणे, वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग केला जातो. सदर मोगरी लावण्याचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व संपूर्ण परिवाराने पार पडले. परशुराम अहिरे आणि त्यांचे सहकारी नितीन शिरसाठ यांनी पारंपरिक पद्धतीने रथासमोर मशाल लावण्याचे काम पहिले. सयाजी पाटील परिवार आणि भक्त यांच्या अथक परिश्रमातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरते लक्षवेधी ठरली. उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह सर्व पोलिस प्रशासनाने चोख प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमPachoraपाचोरा