शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

बहिणाबाई महोत्सव झाला ‘लोकोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:05 IST

सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थितीसंस्कृती या शब्दात दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत. पण जसजसे आधुनिकीकरणाचे वारे ग्रामीण भागापर्यंत पोहचू लागले तेव्हा ग्रामीण संस्कृतीचा काही प्रमाणात लोप होऊ लागला. मात्र आपल्या मातीचे ऋण फेडण्याची, संस्कृतीचे जतन करण्याची गरज निर्माण होऊ लागली. याच उद्देशाने भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘बहिणाबाई महोत्सव’ ही संकल्पना दीपक परदेशी या तरुणाच्या डोक्यात आली आणि सुरू झाला खान्देशी मातीचे ऋण व्यक्त करणारा, खान्देशी संस्कृतीचे जतन करणारा ‘बहिणाबाई महोत्सव’. बघता बघता चार वर्षांच्या प्रवासात लोकांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादामुळे ‘बहिणाबाई महोत्सव’ लोकोत्सव होऊन जनसामान्यांच्या मनावर राज्य करू लागला. याचे द्योतक म्हणजे या महोत्सवाला असणारी लोकांची उपस्थिती.यंदाचे हे महोत्सवाचे चौथे वर्ष होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा, स्थानिक कलावंतांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमांना असलेली प्रेक्षकांची उदंड उपस्थितीने हा लोकोत्सव यशस्वी ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवळपास दीड हजार स्थानिक बाल कलावंतांनी बहिणाबाई महोत्सवाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली. महिलांचे आर्थिक सबलीकरण हाही एक उद्देश या महोत्सवातून महिला बचत गटांच्या स्टॉलची वाढती संख्या पाहता साध्य होताना दिसत आहे.मान्यवरांची उपस्थिती

खान्देशी मातीच्या सुजलाम सुफलामतेने राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्राला अनेक माणिक मोती दिले आहेत. या क्षेत्रातील मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावून कलावंतांना प्रोत्साहन दिले. महिला सक्षमीकरण हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला हा महोत्सव लोकसहभागाच्या प्रचंड प्रतिसादामुळे आता लोकोत्सव झाला आहे. अनेक सामाजिक उत्सव वेळोवेळी होत असतात. पण एकच महोत्सव घेऊन त्यात विविध सामाजिक विषय हाताळून त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अशाप्रकारे सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज झाली आहे.सिनेतारकांची उपस्थिती : महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अधिकाधिक महिला या महोत्सवात सहभागी होत असतानाच, सिनेतारका सई ताह्मणकर, सोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती होय. बहिणाबाई महोत्सवाला त्यांनी दिलेल्या हजेरीने महोत्सवाच्या प्रतिसादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एखाद्या स्त्रीने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात सफल होऊ शकते याचे उदाहरण असणाºया दोन्ही सिनेतारका. सई ताह्मणकर तर सांगलीसारख्या ग्रामीण भागातून संघर्ष करीत आज या पदाला पोहचली आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने व खान्देशी तरुणींमधील आत्मविश्वास वाढवून भविष्यातील कलावंत व उद्योजिका घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता या सिनेतारकांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली. (पूर्वार्ध)- विनोद ढगे

टॅग्स :Jalgaonजळगाव