शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाची कारमधून बॅग लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:06 IST

लॅपटॉप केला लंपास

ठळक मुद्देचोरटा कॅमेरात कैद पेनड्राईव्ह, महत्वाची कागदपत्रे तसेच मेमरीकार्ड लंपास

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-: पैसे पडल्याचे सांगून चालकाचे लक्ष विचलित करत बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांचा 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग कारमधून लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजता नवी पेठेत घडली. संशयित सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बीएचआर मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी येथे अवसायक असलेले जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा.शिवाजी नगर, जळगाव) हे मंगळवारी सकाळी 10.30 वाजता चालक गिरीश संतोष कोळी याच्यासह कारने (क्र.एम.एच.19.बी.यु.2323) नवी पेठेतील लवाद प्राधिकरण कार्यालयासाठी कामानिमित्त आले होते. यावेळी कार्यालयीन कामकाजाची बॅग त्यांनी चालकाच्या बाजुच्या सीटवर ठेवली होती. त्यात लॅपटॉप पेनड्राईव्ह, महत्वाची कागदपत्रे तसेच मेमरीकार्ड असे होते. कंडारे हे लवाद कार्यालयात गेले तेव्हा चालक गिरीश हा कारमध्ये एकटाच होता. रस्त्याच्या कडेला कार उभी केल्यानंतर एक तरूण त्याठिकाणी आला व तुमचे पैसे पडले असे त्याने चालकाला सांगितले. गिरीश यांनी कारखाली उतरून पाहिले असता त्याचवेळी पुन्हा एक तरुणी आली व तीही चालकाला पैसे पडल्याचे सांगून निघून गेली. रस्त्यावर पडलेले चाळीस रुपये उचलून गिरीश कारमध्ये बसला असता सीटवर ठेवलेली बॅग गायब झालेली होती.चोरटा कॅमेरात कैददरम्यान, घटनेनंतर शहर पोलिसांच्या डिबी पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. यानंतर परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटा कैद झाला असून कारमधून बॅग चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्या तरूणाचा पोलीस शोध घेत आहेत.