शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

'अवकाळी'च्या तडाख्याने बेहाल

By admin | Updated: March 2, 2015 13:07 IST

बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले.

जळगाव : बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले. सलग दुसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. या पावसाचा सर्वाधिक तडाखा शिवतीर्थ मैदानावरील मुक्ताई सरसमधील बचत गटांना बसला. तसेच कृषि उत्पन्न बाजारातील धान्याची पोती पाण्याने भिजल्याने नुकसान झाले. तसेच बहुतांश भागातील फीडर ट्रिप झाल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून अनेक भागातील विद्युत पुरवठा रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत खंडित होता. त्यानंतरही दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. ठिकठिकाणी साचले पाण्याचे तळेशनिवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री अकरा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा रात्री १ वाजेच्या सुमारास पावसाने जोर धरला. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते.परिस्थिती पाहून निर्णय घ्या!रविवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रवीण देवरे यांनी जि.प.चे 'सीईओ' आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधून प्रदर्शनस्थळी व्यावसायिकांचे हाल होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रदर्शन बंद करायचे का? अशी विचारणा केली असता सीईओ पांडेय यांनी तेथील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे सांगितले. प्रदर्शनाच्या ठिकाणी चिखल मोठय़ा प्रमाणात साचला आहे. प्रदर्शनाच्या समारोपाला अद्याप दोन दिवस बाकी असले तरी आता व्यवसाय होणे आता अशक्य आहे. शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे शिवतिर्थ मैदानावर प्रचंड चिखल झाल्याने मुक्ताई सरस महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांचे प्रचंड हाल झाले.

'मुक्ताई सरस'मध्ये सहभागी बचत गटांची झालेली दैना. धान्याचे नुकसान अजिंठा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेडबाहेर रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या गहू, मका व इतर धान्याच्या गोण्या पावसाच्या पाण्याने भिजल्याने मोठे नुकसान झाल्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. क्रिकेटचे सामने रद्दसिव्हिल इंजिनिअर असोसिएशनतर्फे कन्स्ट्रक्शन क्रिकेट लिगला शनिवारपासून सागर पार्क मैदानावर सुरुवात झाली. पावसामुळे मैदानाची पूर्णत: वाट लागली असून रविवारी दिवसभरात होणार्‍या दोन उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने रद्द केले आहे. ही स्पर्धा आता बुधवारी होईल, अशी माहिती 'क्रेडाई'चे धनंजय जकातदार यांनी दिली. अवकाळी पावसामुळे मुक्ताई सरसमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांचे हाल झाले. अनेक गटांना प्रदर्शन मध्येच सोडून घरी जावे लागले. -प्रवीण देवरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व दादरचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही सर्वच पिके हातात आली असताना अवकाळीच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. ममुराबाद, कानळदा, फुपनगरी, आव्हाणे परिसरातील गहू आडवा पडला आहे. परिणामी यंदा पुन्हा एकदा गहू, हरभर्‍याची प्रत खराब होणार आहे. आधीच शेतकरी संकटात असताना आता पुन्हा आपत्ती कोसळली आहे. शिवाजीनगर पुलाकडून गेंदालाल मिलकडे जाणार्‍या रस्त्यावर रविवारी असे पाणी साचलेले होते. १६0 बचत गट घराकडे रवाना प्रदर्शनस्थळी सर्वत्र चिखल झाला होता. येथील परिस्थिती पाहून अनेक विक्रेते आपला माल जमा करून रविवारी सकाळीच घराकडे रवाना होताना दिसून आले. दुपारी दोन वाजेपर्यंत २00 पैकी १६0 बचत गटांनी आपले स्टॉल सोडले होते. मुक्ताई सरसमधील बचत गटांचा माल भिजलाया अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे शिवतीर्थ मैदानावर भरलेल्या मुक्ताई सरसमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांना बसला. दोन पैसे मिळावे यासाठी जिल्ह्याच्या कान्याकोपर्‍यातून आलेल्या काही बचत गटांचा माल ओला चिंब झाल्याने नुकसान झाले.