शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातर्फे जनजागृतीपर फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:15 IST

जळगाव : शासनाकडून ब्रेक दी चेन संदर्भात आदेश जारी केले आहे, त्याबाबत जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चौका-चौकांमध्ये फलक ...

जळगाव : शासनाकडून ब्रेक दी चेन संदर्भात आदेश जारी केले आहे, त्याबाबत जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चौका-चौकांमध्ये फलक लावण्‍यात आले आहे.

सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे, असल्याची माहिती फलकावर देण्‍यात आली आहे. तसेच शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून तर सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असणार असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे.

================================

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील खंडेराव नगर भागातील अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि दीपक बिरारी करीत आहे.

=============================

शासकीय अभियांत्रिकीच्या पत्राचा मासूकडून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शुल्क आकारणीबाबत मंत्रालय व वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्‍यात येईल, असे पत्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून काढण्‍यात आले आहे. या पत्राचा महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अभिजित रंधे यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री यांनासुध्दा निवेदन पाठविण्‍यात आले आहे.