शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील ११ साहित्यिकांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:03 IST

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे‘ओवी अनुभवावी अहिराणी’चे संमेलनात प्रकाशनभाषेच्या संवर्धनासाठी अहिराणीतून व्यवहार होण्याची गरज

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा.डॉ.किसन पाटील (जळगाव), प्रा.वा. ना. आंधळे (धरणगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना खान्देशभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अहिराणी ही महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील बहुतांश भागात तसेच गुजरात प्रांतातील काही भागात बोलली जाणारी बोलीभाषा असून, या भाषेच्या संवर्धनासाठी लोकव्यवहार, शिक्षण व्यवहार, राजव्यवहार आणि ग्रंथव्यवहार या भाषेतून होण्याची गरज आहे किंबहुना अहिराणी भाषा टिकविण्यासाठी आणि जतन करण्यासाठी घरा-दारातून आणि सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कीर्तनकार प्रा.चत्रभुज पाटील यांनी केले.व्यासपीठावर मुंबई येथील राजेंद्र गोसावी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, डॉ.एस.के.पाटील, नाना महाजन, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपूत व विजय चव्हाण उपस्थित होते. ग्रंथदिंडी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंधळी नृत्य तसेच ग्रंथकानबाई मिरवणुकीने प्रथम सत्रास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. कमलाकर देसले यांच्या अहिराणीतील पसायदानाने प्रथम सत्राचा समारोप झाला.दुपारच्या सत्रात बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा.रमेश सूर्यवंशी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन रमेश धनगर यांनी केले. त्यानंतर मान्यवर तसेच नवोदित कवींचे कविसंमेलन रंगले. खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक तर निकिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.अहिराणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या ‘ओवी अनुभवावी अहिराणी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर