शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसाला जनसेवेचा जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी जाहीर केल्यानुसार त्यांच्या वाढदिवसाला कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त सोशल ...

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी जाहीर केल्यानुसार त्यांच्या वाढदिवसाला कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारल्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज्य व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांनी भ्रमणध्वनीवरून अभीष्टचिंतन केले, तर जिल्हाभरात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध जनहितार्थ उपक्रम राबविण्यात आले. यात रक्तदान, वृक्षारोपण, जीवनावश्यक वस्तूंसह बियाण्यांचे वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश होता. गुलाबरावजी फाउंडेशनतर्फे कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या जबाबदारीसाठी दात्यांनी सढळ हाताने सुमारे ११ लाखांची मदत फाउंडेशनला केली आहे. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम आठवडाभर चालणार आहेत.

पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे मंत्री पाटील यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता, तर यंदादेखील वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आपण फक्त फोनसह सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. त्यांनी जाहीर केलेल्या क्रमांकावर व्हॉट‌्स ॲप मेसेज, एसएमएस आणि कॉल यांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तर गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खा.विनायक राऊत, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार भावना गवळी, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश सहकाऱ्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले, तर एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून गुलाबरावजी फाऊंडेशनने कोरोनामुळे अनाथ झालेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे अनाथ व निराधार झालेली मुले, विधवा झालेल्या महिला आदींना शासकीय योजनांच्या लाभासह गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाणार आहे. यासाठी आज वाढदिवसाला फाउंडेशनकडे दात्यांनी सढळ हाताने सुमारे ११ लाख रुपयांची मदत केली आहे. या माध्यमातून लवकरच अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे जिल्हाभरात विविध जनहितार्थ उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. यात पाळधीसह भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदींसह अन्य ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यात पाळधी आणि भुसावळ येथे झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये शंभरपेक्षा जास्त बॅग्जचे रक्त संकलन करण्यात आले. तर जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून चिंचोली, धानवड, उमाळे व कंडारी येथील गरीब व गरजू शेतकरी यांना कापूस, ज्वारी व तूर मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. जळगाव शहरात सागर पार्क मैदानावर महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. तर मेहरूण भागातील प्रभाग क्रमांक १५ येथे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सेवाधर्म फाउंडेशननेही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

धरणगाव तालुक्यातही पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने चांदसर येथे १०० व पाळधी येथील कोविड केअर सेंटरमध्ये १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. धरणगाव येथे युवासेनेतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवसेनेतर्फे गोशाळेत पशुखाद्याच्या माध्यमातून अन्नदान आणि रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे अनेक लोककलावंतांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या अनुषंगाने गोंधळी, वासुदेव, पोतराज, करपावली, तुतारी वादक, टिंगरी वादक, वहीगायन, शाहीर व तमाशा व वाघ्या मुरळी या कलावंत अशा सुमारे दीडशे गरजू कलावंतांना लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.