शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी बोकाळले अवैध धंदे

By admin | Updated: January 30, 2017 00:52 IST

पाचो:यातील स्थिती : खुलेआम चालतो सट्टा, अवैध वाहतूक तर बेलगाम

पाचोरा : शहराच्या मध्यवर्ती भागात अवैध धंदे जोरात सुरू असून अवैध वाहतूकही वाढली आहे. याकडे प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी चौकातील बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरात सट्टय़ाच्या दुकानांचे व टप:यांचे पेव फुटले आहे. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच परिसरात लहान-मोठी व्यापारी संकुले असून मुख्य बाजारपेठही आहे.  भाजीमंडीदेखील  असून गर्दीच्या ठिकाणी राजीव गांधी टाऊन हॉलच्या बाजूला असलेल्या मिनी शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर मोठे पत्र्याचे शेड टाकून सट्टय़ाचे दुकान थाटले आहे. लहान लहान टप:यांपासून ते मोठय़ा दुकानांर्पयत सट्टय़ाच्या पेढय़ा शहरातील विविध भागातही  सर्रास सुरू आहेत. लहान मुलांवर विपरीत परिणामशहरातील सभ्य नागरिकांना या परिसरातून वावरताना अवैध धंद्याचे दर्शन घ्यावे लागत आहे. अगदी बाजारपेठेतदेखील ही दुकाने सजली असल्याने दुकानात चिकटलेल्या कागदांपासून  फळे व पाटीवर दिसणारे अंकगणित व बाराखडीचा अर्थपूर्ण अभ्यास लहान शाळाकरी मुलांपासून मोठय़ांर्पयत सगळ्यांना होत असतो. याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहे.जीवघेणी वाहतूकयाव्यतिरिक्त जारगाव चौफुलीहून शेंदुर्णी, पहूर, भडगाव, जळगाव या अनेक शहरार्पयत आणि गावार्पयत होणारी जीवघेणी अवैध वाहतूक  सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जात आहे.  लहान-मोठे टेम्पो, ट्रॅक्स व कालीपिलीच्या माध्यमातून ही वाहतूक सुरू असून प्रमाणापेक्षा  जास्त प्रवासी वाहनात बसवले जातात व लवकर पोहचण्याच्या अपेक्षेने प्रवासीदेखील दुर्घटनेचा विचार न करता धोका पत्करून या अवैध वाहतुकीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. अलीकडेच सावखेडा येथे झालेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या अपघाताची भीषण घटना ताजी असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर अनेकदा प्रवासी भरताना रस्त्यावरच वाहन उभे केले जाते, यामुळे इतर वाहनधारकांची गैरसोय होत असते. काही वेळेस तर वाहतुकीची कोंडीही होताना दिसते. अशा प्रसंगी काही चालक अरेरावी करतात. परिणामी भांडणेही होत असतात. त्यामुळे वाहतुकीस शिस्तही लावण्याची गरज आहे. (वार्ताहर)दखल घेण्याची मागणीअवैध वाहतूक व अवैध धंदे इतके सर्रास सुरू आहेत की, प्रशासन हेतूपुरस्सर अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे की काय हा संभ्रम व्हावा अशी स्थिती आहे. पाचोरा शहरातील  हे अवैध धंदे तत्काळ बंद व्हावेत अशी सामान्य आणि सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे. तर लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त आहे.