शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकºयांचा ‘जागता पहारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:56 IST

कजगाव येथील शेतकºयांची व्यथा : सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे त्रस्त ; दोन दिवस रांगेत उभे राहूनही पदरी निराशा

ठळक मुद्देसर्व्हर डाऊनचा शेतकºयांना सर्वाधिक त्रासएका अर्जासाठी लागतात १५ ते २० मिनिटे.शेतात आंतरमशागतीचे कामे सुरु असताना अर्ज भरण्यासाठी उभे रहावे लागत आहे

आॅनलाईन लोकमतकजगाव ता भडगाव,दि.२ - शासनाने शेतकºयांना घोषित केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी व कुटुंबातील सदस्यांना रात्रंदिवस ई-सेवा केंद्र व ग्रामपंचायती समोर रांग लावावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हरडाऊनचा सर्वाधिक त्रास असल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गाव पातळीवर महा.ई-सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. कजगाव येथील एका केंद्रावर सकाळी ६ वाजेपर्यंत केंद्राबाहेर शेतकºयांना रांग लावावी लागत आहे. दोन-दोन दिवस रांगेतशेतकºयांनी या केंद्रावर सकाळी आठ वाजेपासून रांग लावली होती. अनेक शेतकरी दोन दिवसांपासून रांगेत उभे राहून आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका अर्जासाठी किमान १५ ते २० मिनीट लागत असल्याने तासन्तास शेतकºयांना रांगेत उभे रहावे लागते.सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा केंद्रावर अर्ज भरत असताना सर्व्हर डाऊन होण्याची समस्या सर्वाधिक आहे. त्यातच बहुतांश वेळा सर्व्हरचा आवश्यक स्पीड नसणे, वीज पुरवठा खंडीत असणे, इंटरनेट सेवा बंद असणे यासारख्या अडचणी येत आहेत. रांगेत उभे राहून शेतकरी कंटाळलेले आहेत. त्यातच वयोवृद्ध शेतकरी असल्यास आधार कार्ड व बोटांचे ठसे उमटत नसल्याने अर्ज न भरता माघारी परत येण्याची वेळ येत असते.आंतरमशागतीचे दिवसकाही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतर आता उघडीप आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांकडून आंतरमशागीतचे कामे सुरु आहे. मात्र कर्जमाफीसाठी अर्ज भरत असताना काही प्रकरणांमध्ये शेतकºयांच्या वारसांना देखील उपस्थित रहावे लागत असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. 

तांत्रिक अडचणींवर तोडगा कसा निघणार कर्ज माफी अर्ज भरताना पती किंवा पत्नीच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी मोठी अडचण येत आहे.  बोटांचे ठसे येत नसल्यास बायोमेट्रिक करावे लागते. त्याच्या दुरुस्तीसाठी ७ ते ८ दिवस लागतात. मात्र २० ते २५ दिवस झाल्यानंतरही शेतकºयांच्या बोटांचे ठशांची बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कजगाव चे शेतकरी लालसिंग भिमसिग पाटील, अजबसिग राघो पाटील, रवींद्र प्रल्हाद पाटील, लालसिंग शंकर पाटील, प्रशांत कैलास पाटील, निळंसिंग अजबसिग पाटील या शेतकºयांनी बायोमेट्रिक साठी अर्ज केले आहेत. मात्र अजूनही ते आलेले नाहीत.