शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या चौकशीस पतसंस्थांचे प्रस्ताव पाठविण्यात टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 10:16 IST

लेखापरिक्षकांना नोटीस

ठळक मुद्दे तातडीने कार्यवाहीचे विभाग निबंधकांचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्था या मनीलाँड्रींगसारखे प्रकार झाल्याने अडचणीत आल्या आहेत. अशा टॉप २० पतसंस्थांची चौकशी करून प्रकरणे ‘ईडी’कडे कारवाईसाठी पाठविण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांनी १० जुलै २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्याची जबाबदारी जिल्हा विश्ोष लेखापरिक्षक रावसाहेब जंगले यांच्यावर सोपविण्यात आलेली असतानाही गेल्या दीड-पावणेदोन वर्षात त्यांनी एकही प्रकरण न पाठविल्याने सहविभागीय निबंधक मिलिंद भालेराव यांनी त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. तसेच प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश दिले आहेत.प्रमुख अधिकारी बैठकीस अनुपस्थितअडचणीतील पतसंस्था व करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी अपर निबंधक, नाशिक यांनी बुधवार, २३ जानेवारी रोजी नाशिक येथे बैठकीचे आयोजन केले होते. त्यास जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा विश्ोष लेखा परिक्षक यांनाही बोलविण्यात आले असताना ते बैठकीस मात्र अनुपस्थित होते. तर उपनिबंधक बैठकीस उपस्थित होते.जंगले यांना कारणे दाखवाजिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्था या मनीलाँड्रींगसारखे प्रकार झाल्याने अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे अशा पतसंस्था अडचणीत येण्यास कारणीभूत असलेल्या संबंधीत संस्थेचे तत्कालीन संचालक व अधिकारी तसेच सहकार विभागातील अधिकारी यांच्या प्रकरणांची छाननी करून टॉप २० प्रकरणे, नावांची यादी तातडीने सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीसाठी पाठविण्याकरीता देण्याचे आदेश दि.१० जुलै २०१७ रोजी झालेल्या विभागीय लोकशाहीदिनात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी दिलेहोते.त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांनी जिल्हा उपनिबंधकांना आदेशदिले होते. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्हा विशेष लेखा परिक्षक रावसाहेब जंगले यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. मात्र दीड-पावणेदोन वर्षांचा कालावधी उलटूनही जंगले यांच्याकडून एकाही पतसंस्थेचे प्रकरण सादर केले नाही. वरिष्ठांनी सूचनाकरूनही टाळाटाळ करीत असल्याने सहविभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी बुधवार, २३ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत जंगले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तातडीने चौकशी करून प्रकरणे ‘ईडी’कडे सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भालेराव यांनी दिली.१ हजार कोटींचे पॅकेज द्याशासनाने पतसंस्थांमधील ठेवीदारांना १ हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी या बैठकीत खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे प्रविणसिंग पाटील यांनी या बैठकीत केली.लेखापरिक्षण न करणाऱ्या संस्थांवर कारवाईया आढावा बैठकीत लेखापरिक्षण न करणाºया संस्थांवर १४६ (अ) नुसार कारवाई करण्यात यावी. कर्ज मॅचिंगला पतसंस्थांची प्राथमिकता असते. त्यामुळे ठेवीदारांना रक्कम मिळत नाही. त्यामुळे कर्जमॅचींग हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या प्रकरणांची चौकशी करून प्रकरणे ‘ईडी’कडे पाठविण्याचे आदेश देऊनही त्यास जिल्हा विशेष लेखापरिक्षकांकडून टाळाटाळ झाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. -मिलिंद भालेराव, सहविभागीय सहनिबंधक, नाशिक